uti

UTI AMC IPO

UTI IPO

यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट आयपीओ (IPO)

(UTI:IPO)UTI Asset management Company Ltd. ही २००३ साली चालू झालेली कंपनी असून UTI Trustee company Ltd. या कंपनीस UTI म्युच्युअल फंड चालवण्याकरिता स्थापना करण्यात आली होती. UTI हा भारतातील सर्वात जुना आणि असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) चा नुसार मोठा म्युच्युअल फंड आहे.

 SBI, PNB, Bank of Baroda आणि LIC यांचा UTI म्युच्युअल फंडामध्ये प्रायोजक असून त्यांचा प्रत्येकी १८.२% हिस्सा आहे. तसेच, T. Rowe Price Group यांचा २६% हिस्सा आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या  कंपनीच्या भारतात आणि परदेशात पूर्ण मालकी असलेल्या ७  उपकंपन्या (Subsidiaries) आहेत. त्यामार्फत कंपनी भारत, जपान, सिंगापूर, बहारीन, आणि लंडन इथे काम करत आहे.

 कंपनी UTI म्युच्युअल फंडाच्या  विविध स्कीम्स मॅनेज करत असून कंपनीकडे  १.१ कोटी गुंतवणूकदार आहेत.  तसेच कंपनी पोर्टफोलियो मॅनेजमेंट, ऑफशोर फंडस, अशा सर्विसेस पुरवते. कंपनीचे देशभरात फायनान्शियल ॲडव्हायजर्स आणि सेंटर्स आहेत.

तर या UTI Asset Management Company Ltd. चा आयपीओ (IPO) येत्या २९ सप्टेंबर ला खुला होत आहे. या आयपीओ बद्दल आपण माहिती घेऊया

आयपीओ चा उद्देश

हा आयपीओ बुक बिल्ट इश्यू आहे. या आयपीओ मध्ये OFS(ऑफर फॉर सेल ) द्वारे कंपनीतील शेअर होल्डर्स आपला हिस्सा म्हणजेच ३,८९,८७,०८१ शेअर्स विकणार आहेत. तसेच कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग करू इच्छित आहे. तसेच कंपनी स्वतच्या शेअर्स साठी बाजार उपलब्ध करणे हे कंपनीचे मुख्य उद्देश आहेत   

कंपनीतील भाग धारक आणि त्यांचा  हिस्सा.

अनु .नावसमभाग%
टी. रोवे प्राइस (TRP)३२,९६४,६८६२६
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)२३,१२५,०००१८.२
पंजाब नॅशनल बँक (PNB)२३,१२५,०००१८.२
बँक ऑफ बडोदा (BoB)२३,१२५,०००१८.२
एलआयसी (LIC)२३,१२५,०००१८.२

OFS

या आयपीओ मार्फत कंपनीतील भाग धारक एकूण ३,८९,८७,०८१ शेअर्स विकणार आहेत. या ऑफर मध्ये टी.रोवे प्राइस (TRP)-३८,०३,६१७, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)-१,०४,५९,९४९, पंजाब नॅशनल बँक (PNB)-३८,०३,६१७,  बँक ऑफ बडोदा (BoB)- १,०४,५९,९४९ आणि एलआयसी (LIC) – १,०४,५९,९४९ शेअर्स विकणार आहे .

इन्व्हेस्टर श्रेणी नुसार उपलब्ध शेअर्स

श्रेणीएकूण शेअर्स राखीव%
QIB (क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स)१,९३,९३,५४०५०
NII (नॉन- इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स)५८,१८,०६२१५
RII (रिटेल इंडिव्हिज्यूअल इन्व्हेस्टर्स)१३५७५४७९३५
Employee (कर्मचारी)२,००,००००.५७

UTI AMC IPO तपशील

आयपीओ तारीख२९ सप्टेंबर २०२०- १ ऑक्टोबर २०२०
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज३,८९,८७,०८१
फेस व्हॅल्यू₹१०
प्राइज बॅंड५५२- ५५४
लॉट२७
लिस्टिंग एक्स्चेंजBSE-NSE

 UTI AMC IPO वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख२९ सप्टेंबर २०२०
आयपीओ बंद होण्याची तारीख१ ऑक्टोबर २०२०
अलॉटमेंट तारीख७ ऑक्टोबर २०२०
रिफंड८ ऑक्टोबर २०२०
डिमॅट ट्रान्सफर तारीख९ ऑक्टोबर २०२०
लिस्टिंग तारीख१२ ऑक्टोबर २०२०

आयपीओ लीड  मॅनेजर्स

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड.
ॲक्सिस  कॅपिटल लिमिटेड.
सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
बँक ऑफ अमेरिका मेरील लिंच लिमिटेड .
आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड.
जे. एम. फायनान्शियल लिमिटेड. 
एस. बी. आय. कॅपिटल मार्केट्स लिमिटेड.

रजिस्ट्रार

के.फीन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *