logo

20. Shyam Metalics IPO

श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड आयपीओ

Shyam Metalics IPO: श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड (Shyam Metalics and Energy Limited) ही कंपनी आपला पब्लिक इश्यू आणत आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या आयपीओ नंतर २०२१ या वर्षामध्ये येणारा हा नवा आयपीओ आहे. कंपनीचा आयपीओ येत्या आठवड्यात खुला होत आहे. कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सेबीकडे फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केले होते. 

कंपनीची ओळख

श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड ही आयर्न अँड स्टील सेक्टरची कंपनी असून स्टील इंडस्ट्री मध्ये व्यवसाय करते. कंपनीची स्थापना १० डिसेंबर २००२ रोजी कोलकाता येथे श्याम डीआरआय पॉवर लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीच्या स्वरुपात करण्यात आली. २३ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या शेअर होल्डर्सच्या ठरावानुसार कंपनीचे नाव बदलून श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड असे करण्यात आले. कंपनीचे रजिस्टर्ड आणि कॉर्पोरेट ऑफिस कोलकाता येथे  आहे. 

व्यवसाय

कंपनी भारतातील धातू निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड मुख्यत: लाँग स्टील प्रॉडक्टस आणि फेरो अलॉईज (लोखंडापासून निर्मित मिश्रधातू) यांचे उत्पादन करते. श्याम मेटालिक्स फेरो अलॉईजचे  उत्पादन करणारी भारतातील मोठी कंपनी आहे. श्याम मेटालिक्स स्पॉंज आयर्न इंडस्ट्री मधील एक नामवंत कंपनी आहे. 

श्याम मेटालिक्स पॅलेट्स, बिलेट्स, टीएमटी बार, वायर रॉड, अँगल, बीम्स यांचे उत्पादन करते. या सोबतच कंपनी कस्टमाईज्ड बिलेट्स, स्पेशलाईज्ड   फेरो अलॉईज या सारख्या जास्त नफा मिळवून देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करत आहे.  तसेच कंपनी पिग आयर्न, पाईप्स, ॲल्युमिनिअम फॉईल यासारख्या नव्या प्रॉडक्ट्सचे उत्पादन करत आहे.

कंपनीच्या ३ मॅन्युफॅक्च्युरिंग साईट्स आहेत ज्यात संबळपूर ओडिसा येथिल एक, तर पश्चिम बंगाल मधील जमुरिया आणि मंगलपूर येथिल दोन फॅक्टरिजचा समावेश होतो.  कंपनीच्या संबळपूर आणि जमुरिया येथील प्लँट मध्ये लेट्स, बिलेट्स, टीएमटी बार, वायर रॉड, अँगल, बीम्स यांचे उत्पादन होते. तर पश्चिम बंगाल मधील मंगलपूर येथिल प्लँट मध्ये  स्पॉंज आयर्न  फेरो अलॉईज यांचे उत्पादन होते. कंपनीच्या वरील तिनही मॅन्युफॅक्च्युरिंग  प्लँट्स मध्ये  कॅप्टिव्ह पॉवर  प्लँट असून या द्वारे कंपनी विद्युत निर्मिती करत आहे. वर उल्लेख केलेले प्रॉडक्ट्सचे उत्पादन करताना निर्माण होणाऱ्या  हीट (उष्णता), रिजेक्ट्स(टाकाऊ पदार्थ), गॅसेस यांचा वापर करून  कॅप्टिव्ह पॉवर  प्लँट द्वारे कंपनी विद्युत निर्मिती करत आहे.

कंपनीची वैशिष्टे

  • इंटीग्रेटेड ऑपरेशन्स
  • व्यावसायिक रणणीतीने स्तपण करण्यात आलेले प्लांटस
  • डायव्हर्सिफाइड प्रॉडक्ट पोर्टफोलिओ
  • उत्तम आर्थिक स्थिति, आणि क्रेडिट रेटिंग
  • अनुभवी प्रवर्तक आणि व्यवस्थापन

या कंपनीच्या जमेच्या बाजू आहेत

कंपनीच्या सबसायडरीज

कंपनीच्या ५ डायरेक्ट आणि ७ इनडायरेक्ट सबसायडरीज आहेत. ज्यामध्ये श्याम एसईएल अँड पॉवर लिमिटेड, दामोदर ॲल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड, सिंगभूम स्टील अँड पॉवर लिमिटेड, रेनेसन्स हायड्रोपॉवर प्रायव्हेट लिमिटेड,कलिंगा इन्फ्रा-प्रोजेक्ट्स लिमिटेड या डायरेक्ट सबसायडरीज आहेत तर ह्रस्व स्टोरेज अँड वेअरहाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, मेडो हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, श्याम एनर्जी लिमिटेड, टॉरस इस्टेटस्  प्रायव्हेट लिमिटेड, व्हिस्परिंग डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, निर्झर कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, श्री शिखर आयर्न अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या ७ इनडायरेक्ट सबसायडरीज आहेत.       

फायनान्स

३१-१२-२०२०३१-०३-२०२०३१-०३-२०१९३१-०३-२०१८
असेट्स५१०५१.४७५२०३७.८८४०५२४.३४३४७०६.२८
रेव्हेन्यू३९९५६.३२४३९५३.०२४६८४५.६०३९२०३.९९
करपश्च्यात उत्पन्न४५६३.२१३४०३.२९६३६७.८३५२८०.३९
Shyam Metalics IPO
फायनान्शियल डाटा

आयपीओ (IPO)

श्याम मेटालिक्सचा आयपीओ (Shyam Metalics IPO) येत्या १४ जून रोजी खुला होत असून १६ जून २०२१ पर्यन्त खुला असणार आहे.  कंपनीचा हा आयपीओ ९०९ कोटी रुपयांचा असून त्यात ६५७ कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे तर २५२ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असणार आहे.   

आयपीओचा उद्देश

कंपनी वरील कर्ज कमी करणे आणि इतर सर्वसाधारण कार्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करणे हे या आयपीओ आणण्यामागे  प्रमुख कारण आहे

प्रमोटर्स

महावीर प्रसाद अग्रवाल, ब्रिजभूषण अग्रवाल, संजय कुमार अग्रवाल, शुभम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, शुभम बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड,नरांतक डीलकॉम लिमिटेड, कल्पतरू हॉउसफीन अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, डोराईट ट्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेड, टॉपलाइट मर्कन्टाइल्स प्रायव्हेट लिमिटेड, हे श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेडचे  प्रमोटर्स आहेत.         

आयपीओचा तपशील

आयपीओ खुला होण्याची तारीख१४ जून २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१६  जून २०२१
साईज९०९ कोटी
लॉट साईज४५
प्राईज बँड₹३०३  –  ₹३०६
फेस व्हॅल्यू₹ १०
एक्सचेंज NSE – BSE

महत्वाच्या तारखा

आयपीओ खुला होण्याची तारीख१४ जून २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१६ जून २०२१
बेसिस ऑफ अलॉटमेंट२१ जून २०२१
रिफंड२२ जून २०२१
शेअर क्रेडिट२३  जून २०२१
लिस्टींग२४ जून २०२१

बूक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM)

आयसीआयसीआय सिक्युरिटीज  लिमिटेड.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड   
IIFL सिक्युरिटीज  लिमिटेड.
JM फायनान्शियल लिमिटेड.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स  लिमिटेड   

रजिस्ट्रार

के-फिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनीचा संपर्क

श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड,

(Shyam Metalics and energy Limited)

ट्रीनिटी टॉवर्स, ७वा मजला, ८३, टोपसिया रोड

कोलकाता ७०००८६

पश्चिम बंगाल

E-mail: compliance@shyamgroup.com;

Website: www.shyammetalics.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *