Railtel

7. Railtel IPO : रेलटेल आयपीओ.

रेलटेल आयपीओ

रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel Corporation of India ) आयपीओ आणत आहे. अँथनी वेस्ट, इंडिगो पेंट्स, स्टोव्हक्राफ्ट अशा कंपन्यांच्या आयपीओ नंतर रेलटेलचा आयपीओ येत आहे. उद्योग विश्वासाठी २०२० ही वर्ष फारसे चांगले गेले नसले तरी आता २०२१ या नव्या वर्षात आता आलेल्या बहुतेक आयपीओ ना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेलटेलने २९ सप्टेंबर २०२० रोजी सेबी कडे सादर केले होते. कंपनीचा आयपीओ १६ फेब्रुवारी रोजी खुला होत आहे.

कंपनीची माहिती.

रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. रेलटेल ही टेलिकॉम सेक्टरशी निगडीत कंपनी असून नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणारी भारतातील मोठ्या कंपनीपैकी एक आहे. कंपनीचे भारतभर फायबर नेटवर्क पसरलेले असून विशेषत: रेल्वे ट्रॅक सोबत हे फायबर नेटवर्क टाकण्यात आले आहे. भारत सरकारची मालकी असलेली हि कंपनी मिनीरत्न कंपनी म्हणूनही ओळखली जाते.

रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया २६ सप्टेंबर २००० साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी असून कंपनीची स्थापना दिल्ली झाली. कंपनीने स्वत:चे फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क देशभर पसरलेले आहे. कंपनीने ५८७४२ किमी. चे फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क तयार केले असून याद्वारे ५६७७ रेल्वे स्टेशन, आणि इतर ग्राहक जोडले आहेत. या नेटवर्कचा वापर रेल्वे कंट्रोल, ऑपरेशन आणि सुरक्षेसाठी होत असून याशिवाय कंपनी देशभर ब्रॉडबॅंड सर्व्हिस पुरवत आहे.

मिशन

 1. ब्रॉडबॅंड सर्व्हिससाठी फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क प्लान करून डेव्हलप करणे आणि त्याची देखभाल करणे.
 2. भारतीय रेल्वे वापरत असलेले फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क ताब्यात घेऊन डेव्हलप करणे आणि त्याची देखभाल करणे
 3. विविध प्रकारचे कम्युनिकेशन नेटवर्क उदा. इंटरनेट सेवा, टेलिफोनी, मोबईल नेटवर्क, सॅटेलाइट फोन, VSTAT, गेटवेज, लॅन, वॅन, प्लान करून डेव्हलप करणे आणि त्याची देखभाल करणे
 4. भारतीय रेल्वे साठी अत्याधुनिक कम्युनिकेशन नेटवर्क प्लान करून डेव्हलप करणे आणि त्याची देखभाल करणे.
 5. सरकारी, खाजगी संस्थाना कम्युनिकेशन नेटवर्क लिजवर देणे.
 6. देशभर ब्रॉडबॅंड सर्व्हिससाठी फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क प्लान करून डेव्हलप करणे आणि त्याची देखभाल करणे
 7. रेल्वे सिग्नलिंग प्रोजेक्ट्स डिजाइन आणि डेव्हलप करणे.

ही रेलटेल (Railtel) चे मिशन आहे.

कंपनीच व्यवसाय.

कंपनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठा करते. भारत सरकारची पूर्ण मालकी असलेली ही कंपनी मिनिरत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी खालील सर्व्हिसेसचा पुरवठा रेल्वे, सरकार, आणि खाजगी ग्राहकाना करते. रेलटेल एंटरप्रायजेस लिमिटेड हि रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया ची सबसायडरी असून या कंपनी मार्फत रेलटेल ICT सर्व्हिसेस पुरवते.

 1. टेलिकॉम नेटवर्क सर्व्हिस
 2. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस
 3. मॅनेज्ड डेटा सेंटर आणि होस्टिंग सर्व्हिसेस
 4. सिस्टम इंटीग्रेशन सर्व्हिसेस

भारतभर पसरलेले नेटवर्क, वैविध्यता पूर्ण असलेले व्यावसायिक उत्पाद, भारतीय रेल्वे सोबत असणारी भागीदारी, उत्तम अनुभव आणि स्थिर आर्थिक स्थिति या कंपनीच्या जमेच्या बाजू आहेत. कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस दिल्ली येथे असून मुंबई, सिकंदराबाद, कोलकाता, नवी दिल्ली या ठिकाणी रिजनल ऑफिसेस आहेत.

कंपनी फायनान्शिअल्स


सप्टेंबर २०२०मार्च २०२०मार्च २०१९मार्च २०१८
मालमत्ता२३५०७.००२३९८१.००२२२७६ .७५२३२२८.७९
आय५२७३.७११६६०.०५१०३८२.६६१०२१२.१८
खर्च४६७४.८९३१९.४७८२०५.७७८३५०.९५
नफा४३८.७१४१०.६६१३५३.५६१३४०.०६

IPO

कंपनीचा आयपीओ येत्या १६ फेब्रुवारी २०२१ रोजी खुला होत असून १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हा इश्यू खुला असणार आहे. या आयपीओ मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत ८७१५३३६९ शेअर्स गुंतवणूकदारास उपलब्ध आहेत.

प्रमोटर

भारताचे राष्ट्रपती हे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे प्रमोटर (रेल्वे मंत्रालय द्वारा) आहेत.

आयपीओ उद्देश

निर्गुंतवणूक करणे

शेअर बाजारात कंपनीच्या इक्विटी शेअरचे लिस्टींग करणे आणि त्याचे लाभ मिळवणे

आयपीओ (IPO) तपशील

आयपीओ तारीख१६ फेब्रुवारी २०२१ – १८ फेब्रुवारी २०२१
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज८७१५३३६९
फेस व्हॅल्यू₹ १०
प्राइज बॅंड₹९३ – ₹९४
लॉट१५५
लिस्टिंग एक्स्चेंजBSE-NSE

महत्वाच्या तारखा

आयपीओ खुला होण्याची तारीख१६ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१८ फेब्रुवारी २०२१
अलॉटमेंट तारीख२३ /२४ फेब्रुवारी २०२१
रिफंड२४ फेब्रुवारी २०२१
डिमॅट ट्रान्सफर तारीख२४ फेब्रुवारी २०२१
लिस्टिंग तारीख२६ फेब्रुवारी २०२१

लीड मॅनेजर्स

आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड
आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सेक्युरिटीज लिमिटेड
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड.

रजिस्ट्रार

के-फीन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनीचा संपर्क

रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया

प्लेट A, ६वा मजला ऑफिस ब्लॉक,

टॉवर – २, इस्ट किडवाई नगर, साउथ दिल्ली,

नवी दिल्ली – ११००२३

इ-मेल -: cs@railtelindia.com

One thought on “7. Railtel IPO : रेलटेल आयपीओ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *