crash

मार्केट न्यूज अपडेट (Market News Update)

आजचा बाजार

भारतीय शेयर बाजारात आज मोठी पडझड पाहण्यात आली. बाजारात आज गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बूक करण्यात आला. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज चा इंडेक्स सेंसेक्स १४०६ अंकानी घसरून बाजार बंद होताना ४५५५३.९६ अंकावर स्थिर झाला; तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज चा मुख्य इंडेक्स निफ्टी ४३२.१५ अंकानी खाली येवून १३३२८.४० वर स्थिर झाला. आज भारतीय बाजार एकूण ३ % खाली आला.

इंडेक्स

सेंसेक्स (Sensex) – ४५५५३.९६

निफ्टी (NIFTY 50)- १३३२८.४०

न्यूज

मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटी लिमिटेड कंपनीचा आयपीओ मधील शेअर अलॉटमेंट उद्या होऊ शकते.

अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड आयपीओ आज खुला झाला. आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला असून २ पट सब्सक्राईब झाला आहे.

बर्गर किंग च्या शेयर मध्ये चालू असलेली पडझड आज थांबलेली दिसून आली. सकाळच्या सत्रात हा शेयर १७३ रुपया पर्यंत वर गेला. बाजार बाद होताना हा शेअर १५८ पर्यंत खाली आला.