MTAR Technologies

9. MTAR Technologies IPO Details

MTAR टेक्नॉलॉजिज लिमिटेड आयपीओ.

MTAR Technologies या कंपनीचा आयपीओ पुढिल महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात येत आहे. कंपनीचा आयपीओ हा या वर्षातील ९वा आयपीओ आहे, कंपनीचा आयपीओ मार्च महिन्यातच्या ३ तारखेस खुला होत आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सादर केले होते.

कंपनीची ओळख.

कॅपिटल गुड्स सेक्टरशी सलग्न असणारी ही कंपनी इंजिनीअरिंग मॅन्युफॅक्च्युरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. कंपनीची स्थापना ११ नोव्हेंबर १९९९ रोजी MTAR Technologies Privet Limited (MTAR टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड) या नावाने हैद्राबाद, आंध्र प्रदेश येथे झाली. २० ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या EGM मध्ये झालेल्या निर्णयानुसार कंपनीचे रुपांतर MTAR टेक्नॉलॉजिज लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. त्या पुर्वी कंपनी मशिन टूल्स एड्स अँड रिकंडिशनिंग या नावाने पार्टनरशिप फर्म च्या स्वरुपात १९७० पासून काम करत होती. मूळत: कंपनीची सुरुवात पी. रविंदर रेड्डी, के. सत्यनारायणा रेड्डी आणि पी.जयप्रकाश रेड्डी यांनी केली होती. पर्वत श्रीनिवास रेड्डी, पी. लीलावती, के. शालिनी, डी. अनिता रेड्डी, सी. उषा रेड्डी, जी. कविता रेड्डी, अंशुमन रेड्डी, पी. कल्पना रेड्डी, शरण्या लोका रेड्डी, ए. मनोग्ना आणि एम. माधवी. हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

व्यवसाय

MTAR Technologies हि एक प्रिसिजन इंजिनिअरिंग सोल्युशन्स पुरवणारी कंपनी आहे. कंपनी मिशन क्रिटिकल प्रिसिजन कंपोनंट्स, क्रिटिकल असेंब्लीजचे उत्पादन करते. कंपनी स्वत:च्या न्युक्लिअर, स्पेस, डिफेन्स, आणि क्लिन एनर्जी या सेक्टर मध्ये काम करणार्‍या ग्राहकांसोबत काम करते. कंपनीने भारताच्या आण्विक उर्जा कार्यक्रम, अंतराळ उपक्रम , संरक्षण क्षेत्रात भरिव काम केले आहे.

कंपनीने गेली ३५ वर्षे न्युक्लिअर सेक्टर मध्ये विविध ग्राहकांसोबत काम केले असून भारताच्या न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत गेली १६ वर्षे काम करत आहे. कंपनी न्युक्लिअर सेक्टर मध्ये फ्युअल मशिनिंग हेड, ड्राईव्ह मेकॅनिजम, ब्रिज, कॉलम आणि कुलंट चॅनल असेंब्लीज या सारख्या क्रिटिकल कंपोनंट्सची निर्मिती करते.

यासोबतच MTAR Technologies हि स्पेस आणि डिफेन्स सेक्टर मध्ये काम करणार्या विविध ग्राहकांसाठी क्रिटिकल प्रिसिजन कंपोनंट्स बनवत आहे. कंपनी गेली ३ दशके इसरो, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हेलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) या सारख्या नामांकित संस्थांसोबत काम करत आहे. कंपनीने इसरोच्या विविध स्पेस प्रोग्रॅम्स करिता मिशन क्रिटिकल प्रिसिजन कंपोनंट्सचा पुरवठा केला आहे; ज्यामध्ये लिक्वीड प्रोपल्शन इंजिन, क्रायोजेनिक इंजिनामध्ये वापरण्यात येणारे क्रिटिकल कंपोनंट्स आणि असेंब्लीज यांचा समावेश होतो. DRDO साठी कंपनीने विकसीत करण्यात येणार्‍या मिसाईल्स साठी कॉंप्लेक्स असेंब्लीज, विविध प्रकारचे व्हॉल्व्ह्ज, मशिन्ड कंपोनंट्स यांची निर्मिती आणि पुरवठा केला आहे.

तसेच कंपनी क्लिन एनर्जी सेक्टर मध्ये काम करत आहे. कंपनी पॉवर युनिट्स ची निर्मिती करत असून अमेरिकेतील ब्लुम एनर्जी या कंपनीसाठी हॉट बॉक्सेस, हायड्रोजन बॉक्सेस, इलेक्ट्रोलायजर्स यांचे उत्पादन करते. MTAR Technologies ही गेली ९ वर्षे ब्लुम एनर्जी या कंपनी सोबत काम करत आहे.

कंपनीचे सध्या ७ मॅन्युफॅक्च्युरिंग युनिट्स आहेत ज्यामध्ये एका एक्सपोर्ट ओरियंटेड युनिटचा समावेश आहे. कंपनीचे मॅन्युफॅक्च्युरिंग युनिट्स हैद्राबाद, तेलंगण येथे आहेत.

लार्सन अँड टुब्रो हेवी इंजिनिअरिंग गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्च्युरिंग कंपनी लिमिटेड , लार्सन अँड टुब्रो, वालचंदनगर इंडस्ट्रीज, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्या MTAR Technologies च्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत,

अभियांत्रिकी काैशल्य आणि कॉंप्लेक्स प्रॉडक्ट्सची उत्पादन क्षमता

वैविध्यतापुर्ण प्रॉडक्ट पोर्टफोलिओ.

आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मॅन्युफॅक्च्युरिंग युनिट्स

स्ट्रॉंग सप्लायर बेस, उत्तम ट्रॅक रेकॉर्ड

अनुभवी व्यवस्थापन

हि MTAR Technologies ची व्यावसायिक बलस्थाने आहेत.

फायनान्शिअल्स


३० सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स३५९४.३४३४६२.७१३०५१.५८२८१०.३२
रेव्हेन्यु१२२६.०८२१८१.४२१८५९.१०१६०५.४५
प्रॉफिट (PAT)१९२.१३३१३.१८३९१.९९५४.२३

(सर्व आकडे दशलक्ष रुपयात)

IPO

कंपनीचा हा आयपीओ (IPO) हा बुक बिल्ट इश्यू आहे. MTAR Technologies च्या या आयपीओ मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांचा समावेश असणार आहे. या आयपीओ मध्ये २१,४८,१४९ शेअर्सचा फ्रेश इश्यू तर ८२,२४,२७० शेअर्स ऑफर फॉर सेल द्वारे विक्री करण्यात येतील. हा आयपीओ एकूण १,०३,७२,४१९ शेअर्सचा असणार आहे.

आयपीओ उद्देश

MTAR Technologies कंपनीचा आयपीओ आणण्या मागे

१) कंपनीवरील कर्ज कमी करणे

२) वर्किंग कॅपिटल उभे करणे

३) इतर कॉर्पोरेट उद्दिष्ट पुर्ण करणे

हे उद्देश आहेत.

IPO तपशिल

आयपीओ खुला होण्याची तारीख३ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख५ मार्च २०२१
साईज५९६.४१कोटी
लॉट साईज२६
प्राईज बँड₹५७४ – ₹५७५
फेस व्हॅल्यू₹ १०
एक्सचेंजNSE – BSE

महत्वाच्या तारखा

आयपीओ खुला होण्याची तारीख३ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख५ मार्च २०२१
बेसिस अलॉटमेंट१० मार्च २०२१
रिफंड१२ मार्च २०२१
शेअर्स क्रेडीट१५ मार्च २०२१
लिस्टींग१६ मार्च २०२१

बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM)

JM फायनान्शिअल लिमिटेड.
IIFL सिक्युरिटिज लिमिटेड.

रजिस्ट्रार

के-फिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीचा पत्ता

MTAR टेक्नॉलॉजिज लिमिटेड (MTAR Technologies Limited)

१८, टेक्नोक्रॅट्स इंडस्ट्रीयल इस्टेट,

बालानगर, हैद्राबाद, तेलंगण.

पिन- ५०००३७

इ-मेल -: shubham.bagadia@mtar.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *