compny-logo

Mrs. Bectors Food IPO

Mrs. Bectors Food IPO

मिसेस बेक्टर्स फूड IPO

कंपनीची माहिती

Mrs. Bectors Food IPO: मिसेस.बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड (MRS. BECTORS FOOD SPECIALITIES LIMITED) कंपनी आयपीओ (IPO)आणत आहे. कंपनीचा आयपीओ १५ डिसेंबर रोजी खुला होणार आहे. १५ सप्टेंबर १९९५ साली क्वेकर क्रिमीका फूडस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची स्थापना झाली होती. १९९९ साली कंपनीचे नाव बदलून मिसेस.बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड असे करण्यात आले.

कंपनीचा व्यवसाय

मिसेस.बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड ही कंपनी FMCG सेक्टर मधील कंपनी असून फूड इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. कंपनी नॉन-ग्लुकोस बिस्किटस, डायजेस्टिव बिस्किटस, क्रॅकर्स, कुकीज, ब्रेड, बन यांचे उत्पादन करते. कंपनीची उत्पादने दिल्ली, हिमाचल, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या  भागात प्रसिद्ध आहेत.

मिसेस.बेक्टर्स क्रिमिया आणि इंग्लिश ओव्हन ही कंपनीचे दोन प्रमुख ब्रॅंड आहेत. कंपनी मिसेस.बेक्टर्स क्रिमिया या ब्रॅंड नेम खाली  नॉन-ग्लुकोस बिस्किटस, डायजेस्टिव बिस्किटस विकते. कंपनी इतर कंपन्यांसाठी कारारा- अंतर्गत बिस्कीटांचे उत्पादन करते. ओरिओ, आणि बोर्नव्हिटा या लोकप्रिय बिस्कीटांचे उत्पादन कंपनीत होते. 

कंपनीची बिस्किटे आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या सह ६४ देशात एक्सपोर्ट होत असून ती विविध नावाने विकली जातात .

कंपनी इंग्लिश ओव्हन या ब्रॅंड नेम खाली ब्रेडस् विकत आहे, कंपनीचे प्रीमियम क्वालिटीचे ब्रेड दिल्ली NCR, उत्तर भारत तसेच महाराष्ट्रात विक्री केले जातात. कंपनी  गर्लिक ब्रेड, स्टफड्  ब्रेड असे विविध पद्धतीचे ब्रेडस्चे उत्पादन आणि विक्री करते

याशिवाय कंपनी हार्डकॅसल रेस्टॉरंटस लिमिटेड, बर्गर किंग इंडिया लिमिटेड या सारख्या मोठ्या क्वीक सर्व्हिस रेस्टॉरंटसना (QSR) बन्स चा पुरवठा करते. कंपनी भारतातील बन चा पुरवठा करणारी मोठी कंपनी आहे. तसेच कंपनीने अलीकडे फ्रोजन फूडस चे उत्पादन सुरू केले आहे ज्या मध्ये फ्रोजन पिझ्झा, क्वासॉन (croissant), मफीन्स या सारख्या पदार्थाचा समावेश होतो. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलियो मध्ये ५०२  SKU’s आहेत. कंपनी  भारत सरकारच्या CSD ची मोठी सप्लायर आहे.

कंपनीच्या भारतात एकूण ६ ठिकाणी उत्पादन केंद्रे (Manufacturing Facilities) आहेत. पंजाब मध्ये फिलौर आणि राजपुरा, हिमाचल प्रदेश मध्ये ताहिलपुरा येथे, उत्तर प्रदेशात ग्रेटर नोईडा, महाराष्ट्रात खोपोली येथे तर कर्नाटकात बेंगळुरू येथे कंपनीची उत्पादन केंद्रे (Manufacturing Facilities) आहेत.

कंपनीची वैशिष्ट्ये

वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो, स्ट्रॉंग ब्रॅंड, क्वालिटी प्रॉडक्ट्स् 

सर्टिफाइड उत्पादन केंद्रे (Manufacturing Facilities)

६४ देशात एक्सपोर्ट

मोठे ग्राहक स्ट्रॉंग डिलर नेटवर्क

अनुभवी व्यवस्थापन

ही कंपनीची बलस्थाने आहेत.

कंपनी भारतात आणि बाहेर व्यवसाय वृद्धी करण्या साठी  प्रयत्नशील आहे. तसेच कंपनी स्वत:चा प्रॉडक्ट पोर्ट फोलिओ वाढवण्यासाठी काम करत आहे. 

प्रमोटर

श्री.अनूप बेक्टर ही कंपनीचे प्रमोटर आहेत

कंपनीचा आर्थिक तपशील

(आकडे दशलक्ष रुपयात.)

 ३१ मार्च २०१८३१ मार्च २०१९३१ मार्च २०२०
एकूण आय६९५७.५५७८६०.२९७६४९.७६
एकूण खर्च६४२९.३१७३५४.४१७२५८.३३
कर वजा जाता फायदा३५८.९३३३१.५०३०४.०३

आयपीओ उद्दिष्टे

राजपुरा येथे असलेल्या कंपनीच्या उत्पादन केंद्राची  (Manufacturing Facility) क्षमता वाढवणे आणि विकास करणे.

 इतर कार्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करणे 

IPO तपशील

कंपनीचा आयपीओ ५४०.५४  कोटी रुपयांचा आहे. ज्या मध्ये ५०० कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल असून फ्रेश इश्यू  ४०.५४ कोटी रुपयांचा आहे.

तपशील

आयपीओ तारीख१५  डिसेंबर २०२०-   १७  डिसेंबर २०२०
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज५४० कोटी
फेस व्हॅल्यू₹ १०  
प्राइज बॅंड₹२८६  – ₹ २८८   
लॉट५०
लिस्टिंग एक्स्चेंजBSE

Mrs. Bectors Food IPO वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख१५ डिसेंबर  २०२०
आयपीओ बंद होण्याची तारीख१७  डिसेंबर  २०२०
अलॉटमेंट तारीख२२  डिसेंबर  २०२०
रिफंड२३  डिसेंबर  २०२०
डिमॅट ट्रान्सफर तारीख२४  डिसेंबर  २०२०
लिस्टिंग तारीख२८  डिसेंबर  २०२०

IPO लीड मॅनेजर्स

एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड
IIFL सिक्युरिटीज  लिमिटेड

IPO रजिस्ट्रार   

लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनीचा संपर्क     

रजि. ऑफिस

मिसेस.बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड

थिइंग  रोड फिलौर  जालंधर पंजाब

१४४४१०

कार्पोरेट ऑफिस

मिसेस.बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड

११-A उद्योग विहार, गौतम बुद्ध नगर

ग्रेटर नोईडा, उत्तर प्रदेश

२०१३०८

E-mail: compliance@cremica.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *