IRFC IPO

IRFC IPO: २०२१ मधील पहिला आयपीओ.

IRFC IPO

IRFC अर्थात इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन आयपीओ (IPO)आणत आहे. कंपनीची स्थापना १२ डिसेंबर १९९६ साली कंपनी ॲक्ट १९५६ अंतर्गत दिल्ली येथे झाली. इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन अर्थात (IRFC) ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. रीजर्व बँक ऑफ इंडिया ने कंपनीला नॉन-डिपॉजीट ॲक्सेप्टिंग नॉन बँकिंग कंपनी म्हणून मान्यता दिली आहे.

 कंपनीची ओळख

इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन अर्थात (IRFC) ही कंपनी रेल्वेसाठी बाजरातून पैसा उभा करण्याचे काम करते. IRFC या कंपनीची संपूर्ण मालकी भारत सरकारकडे (रेल मंत्रालय) आहे.  भारतीय रेल्वेचे प्रोजेक्ट्स, आणि ॲसेट्स साठी भांडवल पुरवठा करणे, आणि रेल मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या  इतर संस्थाना पत पुरवठा करणे हा  IRFC चा  मुख्य व्यवसाय आहे.

भारतीय रेलवे  जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्क्स पैकी एक आहे जे सातत्याने विस्तारत आहे. या विस्तार करण्यासाठी रेल मंत्रालय भांडवल उभे करण्याचे काम इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन अर्थात (IRFC) या कंपनी द्वारे करते.

कंपनीची उद्दिष्टे

 • रोलिंग स्टॉक ॲसेट्स उदा. लोकोमोटीव्ह, वॅगन, ट्रॅक मशीन्स. इ. साठी पत पुरवठा करणे.
 • रेल्वेचे, ऑफिसेस, स्टेशन्स,  ब्रिजेस, ट्रॅक्स, सिग्नलिंग इक्विपमेंट्स, पॉवर प्लांटस आणि या सदृश ॲसेट्स साठी पतपुरवठा करणे.
 • रेल्वेच्या  विविध उपक्रमासाठी पत पुरवठा करणे
 • रेल्वे साठी बाजारातून कर्ज घेऊन पैसे उभे करणे.
 • रेल्वेच्या  विविध उपक्रमासाठी सल्ला देणे
 • रेल्वेकडील पैसा मुच्युअल फंडस, शेअर्स या सारख्या इन्स्ट्रूमेंट्स मध्ये गुंतवणे.
 • रेल्वे आणि भारत सरकारचे विकास उपक्रम सक्षमपणे  राबवणे.

कंपनीचा व्यवसाय

भारत सरकारची पूर्ण मालकी असलेली ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीला RBI ची मान्यता प्राप्त असून कंपनी नॉन-डिपॉजीट ॲक्सेप्टिंग NBFC म्हणून ओळखली जाते. कंपनीने गेली ३० वर्षे रेल्वेला पत पुरवठा केला आहे. IRFC टॅक्सेबल आणि टॅक्स फ्री बॉन्डस् , बँक, फायनान्शियल इंस्टिट्यूट, कमर्शियल पेपर याद्वारे घेतलेले टर्म लोन्स, आणि इतर बाह्य कमर्शियल बॉरोइंग्ज या द्वारे पैसे उभे करते आणि रेल्वे आणि रेल्वेशी संबंधित इतर संस्थाना पत-पुरवठा करते.  भारतीय रेल्वेच्या रोलिंग स्टॉक ॲसेट्ससाठी कंपनीने वर्ष २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ७२%,९३%,आणि ८३% पतपुरवठा केला आहे.  भारतीय रेल्वेचा प्रमुख पतपुरवठादार असल्याने कंपनीने रेल मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर PSU ला पतपुरवठा केला आहे.

२०२१च्या फिस्कल वर्षात रेल्वे मंत्रालयाने IRFC कडून ६२५.६७ बिलियन रुपये कर्जाऊ घेण्याचे उद्दिष्टय ठेवले आहे. ज्यामध्ये ३३१.३७ बिलियन रुपये रोलिंग स्टॉक ॲसेट्ससाठी १४.३० बिलियन रुपये RVNL च्या प्रोजेक्ट्स साठी तर २८० बिलियन रुपये EBR-IF (एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस इन्स्टिट्यूशनल फायनान्सिंग ) प्रोजेक्ट्स साठी घेण्याचे ठरवले आहे.

प्रॉफिट

२०१८, २०१९,२०२० आणि या फिस्कल वर्षात कंपनीचा प्रॉफिट अनुक्रमे २००१४.६० दशलक्ष रुपये २१३९९.३३  दशलक्ष रुपये ३१९२०.९६ दशलक्ष रुपये होते. २०२० चे सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या कालखंडातील उत्पन्न १८८६८.४१ इतके होते.

रेटिंग्ज

IRFC ला क्रिसिल (CRISIL) कडून AAA/A1+, इकरा कडून (ICRA) AAA/A1+, केअर (CARE) कडून AAA/A1+, तर मुडीजकडून Baa3 (निगेटिव्ह) , स्टँडर्ड अँड पुअर्स कडून BBB- (स्टेबल), फीच कडून BBB- आणि जापनीज क्रेडिट रेटिंग एजन्सी कडून BBB+ (स्टेबल) रेटिंग मिळालेले आहे.

कंपनीची बलस्थाने

 • भारतीय रेल्वेच्या आर्थिक वाढीमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणारी मोठी पत पुरवठा करणारी कंपनी
 • उत्तम क्रेडिट रेटिंग आणि विविध स्त्रोतांवर आधारित कमी किमितीत कर्ज उभ करण्याची क्षमता
 • उत्तम आर्थिक ताळेबंद
 • कमी जोखीम असणार व्यवसाय
 • उत्तम ॲसेट क्वालिटी आणि अनुभवी व्यवस्थापन

या IRFC च्या जमेच्या बाजू आहेत.

भारताचे राष्ट्रपती ही कंपनीचे प्रमोटर आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीची १००% मालकी आहे कंपनी मध्ये सध्या २४ पूर्णवेळ कर्मचारी काम करत असून गरजे  प्रमाणे कंपनी आउट सोर्सिंग करत असते.

IRFC फायनान्सेस

 ३१ सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स२९१९८६५.१९ २७५५०४१.२९२०६४३८२.९५१६१४५१०.४१
लायबिलिटी२६०२९९६.१४२४५२०४३.७७१८१५७१९.९६१४११२६७.५८
रेव्हेन्यू७३८४८.२९१३४२१०.९०१०९८७३.५५९२०७८.३९
प्रॉफिट१८८६८.४१३१९२०.९६२१३९९.३३२००१४.६०

आकडे दशलक्ष रुपयात

IRFC IPO ऑफर

IRFC चा हा आयपीओ  १,७८,२०,६९,०००  शेअर्सचा असून या आयपीओ मध्ये ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यूचा समावेश असणार आहे. या आयपीओ मध्ये १,१८,८०,४६,००० शेअर्स फ्रेश इश्यू  द्वारे तर ५९,४०,२३,००० शेअर्स  ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री करण्यात येणार आहेत.

IRFC IPO ऑफरचे उद्दिष्ट

 • व्यवसायवृद्धी साठी कंपनीचे इक्विटी कॅपिटल वाढवणे
 • कंपनीच्या सर्वसाधारण कार्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करणे

IRFC IPO तपशील

आयपीओ तारीख१८  जानेवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख२० जानेवारी २०२१
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज१,७८,२०,६९,०००  शेअर्स 
फेस व्हॅल्यू       १०
प्राइज बॅंड        ₹२५-₹२६
लॉट५७५
लिस्टिंग एक्स्चेंज BSE, NSE

IRFC IPO वेळापत्रक (अंदाजे)

आयपीओ खुला होण्याची तारीख   १८  जानेवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख     २० जानेवारी २०२१
बेसिस ऑफ अलॉटमेंटची  तारीख  २५ जानेवारी २०२१
रिफंड२७  जानेवारी २०२१
डिमॅट ट्रान्सफर तारीख     २८  जानेवारी २०२१
लिस्टिंग तारीख  २९  जानेवारी २०२१

IRFC IPO लीड मॅनेजर्स

DAM कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड (पूर्वी-  IDFC सिक्युरिटीज लिमिटेड )
HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स इंडिया लिमिटेड
ICICI सिक्युरिटीज लिमिटेड
SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड

रजिस्ट्रार

 के फीन टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

IRFC संपर्क

पत्ता -:UG- फ्लोर, ईस्ट टॉवर, NBCC प्लेस, भीष्म पितामह मार्ग, प्रगती विहार, लोधी रोड नवी दिल्ली ११०००३

E-mail -: dgmcs@irfc.nic.in;

Website -: www.irfc.nic.in;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *