irctc-logo

IRCTC OFS

आयआरसीटीसी ऑफर फॉर सेल

IRCTC OFS Offer

भारत सरकार इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड  IRCTC या कंपनीतील २०% हिस्सा बाजारात विकणार आहे. सरकार या कंपनीतील आपला हिस्सा ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकणार आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये कंपनीचे २.४ कोटी शेअर्स बाजारात विक्रीस आणणार आहे. या OFS मध्ये कंपनीच्या शेअरची फ्लोर प्राइज ₹१३६७ इतकी ठेवण्यात आली असून हा इश्यू १० आणि ११ डिसेंबर रोजी खुला असणार आहे. रिटेल इन्व्हेस्टर ११ डिसेंबर रोजी या ऑफर मध्ये शेअर्स खरेदी करू शकतो.

OFS Size

या ऑफर फॉर सेल द्वारे सरकार ४२७३ कोटी रुपये उभे करणार आहे.या OFS साठी कंपनी कडून ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, आणि HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स इंडिया लिमिटेड या ब्रोकर्सची नेमणूक करण्यात आली आहे.

IRCTC कंपनी

 IRCTC ही भारत सरकारची कंपनी असून सरकारकडे  यात ८७% हिस्सा आहे. रेल्वे तिकीट विक्री, तसेच रेल्वे साठी केटरिंग सर्व्हिसेस पुरवणे, टुर्स अरेंज करणे हा कंपनीचा व्यवसाय आहे. भारतीय रेल्वेची तिकीट विक्री करण्याचा अधिकार या कंपनीकडे असून अलीकडे रेल नीर या नावाने पॅकेजड ड्रिंकिंग वॉटर बाजारात आणले होते.

गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये आयआरसीटीसी ने आयपीओ आणला होता ज्यास उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओ द्वारे  कंपनीने ६४५ कोटी रुपये उभे केले होते.

कंपनीचा शेयर सध्या १६०० रुपयावर ट्रेड करत आहे. एक वर्षात या शेयर ने गुंतवणूकदारास उत्तम परतावा दिला  आहे.     

Disclaimer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *