indigo paints logo IPO

IPO: इंडिगो पेंट्स

इंडिगो पेंट्स आयपीओ

इंडिगो पेंट्स लिमिटेड ही कंपनी आपला आयपीओ (IPO) आणत आहे. इंडिगो पेंटस् लिमिटेड ही केमिकल सेक्टर शी संबंधित कंपनी असून विविध प्रकारचे डेकेरेटीव्ह पेंट्सची  (रंग) निर्मिती करते. कंपनीने नोव्हेंबर मध्ये सेबी कडे आयपीओ आणण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सादर केले आहे. कंपनीचा आयपीओ येत्या २० तारखेस खुला होणार असून २२  या तारखेपर्यंत खुला राहणार आहे.

कंपनीची ओळख आणि इतिहास

कंपनीची स्थापना २८ मार्च २००० साली पुणे येथे इंडिगो पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने झाली. नंतर पुढे २० ऑगस्ट २०२० रोजी कंपनीचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले आणि कंपनीचे नाव इंडिगो पेंट्स लिमिटेड असे करण्यात आले. हेमंत जालान, अनीता जालान, पराग जालान, कमलाप्रसाद जालान, तारादेवी जालान आणि हॅलोजन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड हे इंडिगो पेंट्स लिमिटेडचे प्रोमोटर्स आहेत.  

कंपनीचा व्यवसाय

इंडिगो पेंट्स लिमिटेड ही कंपनी डेकोरेटीव्ह पेंट्स निर्मितीच्या क्षेत्रात व्यवसाय करते. इंडिगो पेंट्स लिमिटेड ही कंपनी भारतातील ५व्या क्रमांकाची मोठी डेकोरेटीव्ह पेंट्स निर्माण करणारी कंपनी आहे. कंपनी विविध प्रकारचे डेकोरेटीव्ह पेंट्स बनवत असून ज्या मध्ये इमल्शन, इनॅमल, वूड कोटींग, डिस्टेंपर, प्रायमर्स, पुट्टी आणि सीमेंट पेंट्स यांचा समावेश होतो. तसेच कंपनीने भारतात मेटालीक इमल्शन, ब्राईट सीलिंग कोट इमल्शन, फ्लोर कोट इमल्शन, डर्ट अँड वॉटर प्रूफ एक्सटेरियर लॅमिनेट, इंटेरियर अँड एक्सटेरियर लॅमिनेट, PU सुपर ग्लॉस लॅमिनेट असे प्रॉडक्ट सादर केले आहेत.

कंपनीच्या भारतात ३ मॅन्युफॅक्च्युरिंग साइट्स आहेत. ज्या राजस्थानमध्ये जोधपुर येथे , केरळमध्ये कोची येथे , आणि तामीळनाडू मध्ये पुदुकोट्टई येथे आहेत. कंपनीने जोधपुर फॅसिलिटी २००० साली चालू केली असून तिथे लिक्विड पेंट्स,सीमेंट पेंट्स आणि पुट्टी यांचे मॅन्युफॅक्च्युरिंग केले जाते. येथे कंपनीचे २ युनिट्स आहेत. कंपनीने कोची येथील मॅन्युफॅक्च्युरिंग साइट २०१६ मध्ये चालू केली असून येथे कंपनी वॉटर बेस्ड पेंट्स,इमल्शन, प्रायमर्स यांचे उत्पादन करते. वर उल्लेख केल्या प्रमाणे कंपनीचे  तिसरी मॅन्युफॅक्च्युरिंग साईट तामीळनाडू मध्ये पुदुकोट्टई येथे असून इथे कंपनी सॉल्वंट बेस इनॅमल, वूड कोटींग्ज आणि इतर काही प्रोडक्ट्स यांचे उत्पादन करते.  

  कंपनीचे भारतात २७ राज्ये आणि ७ युनियन टेरिटरीज मध्ये  डिलर्सचे नेटवर्क पसरलेले आहेत. सुरवातीस कंपनीने स्वत:चे डिलर्स नेटवर्क टियर २ आणि टियर ३ शहरात वाढवले होते. नंतर कंपनीने टियर-१ शहरे आणि मेट्रो शहरामध्ये स्वत:चे डिलर नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली. कंपनीचे भुतान मध्येही डिलर आहेत. भुतान मध्ये कंपनीचे १४ दिलर्स आहेत.  कंपनीचे सध्या १०९८८ डिलर्स तर ४० डेपो आहेत. 

  • उत्तम ट्रॅक रेकॉर्ड.
  • मोठा प्रॉडक्ट पोर्टफोलियो
  • फोकस्ड  ब्रॅंड बिल्डिंग
  • मोठे आणि देशात खोलवर रुजलेले डिलर नेटवर्क
  • व्यावसायिक रणनीतीने उभारण्यात आलेल्या मॅन्युफॅक्च्युरिंग साईट्स

ही या कंपनीची बलस्थाने आहेत.

कंपनी फायनान्शियल्स

 ३० सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स४११२.९१४२१९.६९३७३१.८३     २९७३.९४
लायबलिटीज१८६९.१८२२४९.०६२२५७.२०१६९९.३३
इन्कम (आय)२६०२.४३६२६४.३६५३७२.६२४०३१.०५
एक्सपेन्स (खर्च)२२५०.१८५५९०.०९५०३२.४७३८९२.३५
प्रॉफिट (कर पश्चात)२७२.०५४७८.१५२६८.७०१२८.६२

(आकडे दशलक्ष रुपयांत)

IPO ऑफर

 इंडिगो पेंट्स लिमिटेडचा आयपीओ येत्या २० जानेवारी २०२१ रोजी खुला होणार असून २२ जानेवारी २०२१ पर्यंत खुला राहणार आहे. सदर आयपीओ हा बूक बिल्ट इश्यू असून  या मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांचा समावेश असणार आहे.

IPO ची उद्दिष्ट्ये

आयपीओ द्वारे उभे करण्यात आलेले भांडवल कंपनी खालील कारणांसाठी वापरणार आहे.

  • पुदूकोट्टाई येथील मॅन्युफॅक्च्युरिंग साइटचा विकास करणे.
  • टिंटींग मशीन्स आणि गायरोशेकर्स अशा मशीन्सची खरेदी करणे.
  • कंपनी वरील कर्ज कमी करणे
  • इतर कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये पूर्ण करणे.

या आयपीओ मध्ये ३०० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार असून . तर  ५८४०००० शेअर्स ही ऑफर फॉर सेल द्वारे गुंतवणूकदारास आयपीओ मध्ये ऑफर करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेल द्वारे Sequoia IV, SCII V, आणि हेमंत जालान शेअर्स विकणार आहेत. यामध्ये Sequoia IV २०,०५,००० शेअर्स, SCII V २१,६५,००० शेअर्स, तर हेमंत जालान १६,७०,००० शेअर्स विकणार आहेत. या आयपीओ मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ७०००० शेअर्स राखीव असणार आहेत.

IPO तपशील

आयपीओ तारीख२० जानेवारी  २०२१ – २२ जानेवारी  २०२१ 
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज११७६ कोटी
फेस व्हॅल्यू₹१० 
प्राइज बॅंड₹१४८८   – ₹ १४९०
लॉट१०
लिस्टिंग एक्स्चेंजBSE-NSE

IPO वेळापत्रक (अंदाजे)

आयपीओ खुला होण्याची तारीख२० जानेवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख२२ जानेवारी २०२१
अलॉटमेंट तारीख२८ जानेवारी २०२१
रिफंड२९ जानेवारी २०२१
डिमॅट ट्रान्सफर तारीख१ फेब्रुवारी २०२१
लिस्टिंग तारीख२ फेब्रुवारी २०२१

बूक रनिंग लीड मॅनेजर्स

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड.
एडेलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
आयसीआयसीआय  सेक्युरिटीज लिमिटेड.

रजिस्ट्रार

लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनी कॉंटॅक्ट

रजिस्टर्ड आणि कॉर्पोरेट पत्ता

इंडिगो टॉवर, स्ट्रीट -५, पल्लोड फार्म-२, बाणेर रोड, पुणे, ४११०४५

Web-: https://indigopaints.com;

कॉंटॅक्ट- सुजय बोस;

ईमेल -: secretarial@indigopaints.com;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *