Heranba Industries Limited ,logo

8. Heranba Industries Limited IPO

७.हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ

सारांश

 Heranba Industries Limited / हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड हि कंपनी आयपीओ ( IPO) आणत आहे. न्युरेका, रेलटेल यांच्या आयपीओ नंतर हेरंबा इंडस्ट्रीज आयपीओ आणत आहे.  हेरंब इंडस्ट्रीजचा  आयपीओ हा २०२१ मधील ८वा आयपीओ आहे. हेरंबा इंडस्ट्रीजने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सप्टेंबर २०२० मध्ये सादर केले होते. कंपनीचा  आयपीओ येत्या २३ फेब्रुवारी २०२१ रोजी खुला होणार आहे.

कंपनीचा इतिहास

हेरंबा  इंडस्ट्रीज लिमिटेड हि केमिकल सेक्टरची कंपनी असून कंपनी पेस्टीसाईड्स आणि ॲग्रोकेमिकल्स इंडस्ट्रीमध्ये काम करते. कंपनीची स्थापना १७ मार्च १९९२ रोजी हेरंबा इंडस्ट्रीयल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने दादरा आणि नगर हवेली, गुजरात येथे झाली. १५ जुन १९९६ रोजी झालेल्या EGM (एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मिटींग) मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कंपनीचे रुपांतरण हेरंबा इंडस्ट्रीयल केमिकल्स लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. नंतर  ॲग्रोकेमिकल्स व्यवसायात पदार्पण करताना कंपनीचे नाव  हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड असे बदलण्यात आले. सदाशिव शेट्टी आणि रघुराम शेट्टी हे  हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.  कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस वापी, गुजरात येथे आहे; तर कॉर्पोरेट ऑफिस मुंबई येथे बोरिवली मध्ये आहे.

व्यवसाय

वर उल्लेख केल्या प्रमाणे कंपनी  पेस्टीसाईड्स आणि ॲग्रोकेमिकल्स निर्मिती  करते,  हेरंबा  इंडस्ट्रीज लिमिटेड हि पिकांचे संरक्षण करणार्‍या केमिकल्सचे उत्पादन, निर्यात आणि मार्केटींग करते. कंपनी इंटरमिजिएट्स, टेक्निकल्स, फॉर्म्युलेशन्स यांचे  उत्पादन करत असून  त्यामध्ये पायरेथ्रॉईड्स, सायपरमेथ्रीन, अल्फा- सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, परमेथरिन अशा केमिकल्सची निर्मिती  करते.  कंपनी कडून बनवण्यात येणार्‍या पेस्टीसाईड्स मध्ये इन्सेक्टीसाईड्स, हर्बीसाईड्स, फंगीसाईड्स आणि पब्लिक हेल्थ प्रॉडक्ट्स यांचा समावेश होतो.  कंपनीकडे  टेक्निकल्सची भारतात निर्मिती आणि विक्री करण्यासाठी १८; टेक्निकल्स आणि फॉर्म्युलेशन्सचे परदेशातील बाजरात विक्री करण्यासाठी १०३; तर भारतात निर्मिती आणि विक्री करण्यासाठी १६९ रजिस्ट्रेशन्स आहेत.   कंपनीची भारतात विकल्या जाणार्‍या  फॉर्म्युलेशन्स पैकी जयम, प्रोग्रेस प्लस, मंत्रा, डायकेन, ॲस्ट्रॅान, शेरा, ग्लोरी ७१, शॅडो, सल्फी, टँपर,  रॅट किल, यांचा समावेश होतो.

कंपनीचे सध्या ५ बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. या मध्ये डोमेस्टिक इन्स्टीट्युशनल सेल्स, टेक्निकल्स एक्सपोर्ट्स, ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स, ब्रँडेड फॉर्म्युलेशन्स एक्सपोर्ट्स, पब्लिक हेल्थ, यांचा समावेश होतो.  या बिझनेस व्हर्टिकल्स द्वारे कंपनी भारतात आणि परदेशात आपल्या उत्पादनांची विक्री करते. 

 हेरंबा इंडस्ट्रीजचे प्रॉडक्ट्स लॅटिन अमेरिका, मिडल ईस्ट, आफ्रिका, साऊथ  ईस्ट आशिया या भागातील ६० देशात निर्यात होतो. यासोबतच कंपनीचे भारतात चांगले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. कंपनीचे भारतातील १६ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात २१ डेपो आणि ९४०० डीलर्स आहेत. कंपनीच्या गुजरात मध्ये वापी येथे  ३ मॅन्युफॅक्च्युरिंग फॅसिलीटीज आहेत. स्थिर

  • विविध प्रॉडक्ट्स
  • ग्लोबल रीच
  • सशक्त प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओ आणि चांगले  डिस्ट्रीब्युशन नेटवर्क
  • स्थिर  कंज्युमर बेस
  • अनुभवी  प्रवर्तक आणि व्यवस्थापन

ही या कंपनीची व्यावसायिक बलस्थाने आहेत.

फायनान्शियल्स

 ३० सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स७८८१.२०६२४७.६३५६०४.४३४५०४.६५
रेव्हेन्यू६१९२.११९६७९.०६१०११८.३८७५०४.१०
नफा (PAT)६६३.११९७७.५०७५४.०२४६८.७६

(आकडे दशलक्ष रुपयात)

आयपीओ

ऑफर

हेरंबा इंडस्ट्रीजचा आयपीओ (IPO) २३ फेब्रुवारी २०२१ रोजी खुला होत आहे. हा इश्यु ३ दिवस खुला असून २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत  हा आयपीओ खुला असणार आहे. कंपनीचा हा  आयपीओ बुक बिल्ट इश्यु आहे. या  आयपीओ मध्ये ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यु यांचा समावेश आहे.  हेरंब  इंडस्ट्रीजच्या या आयपीओ मध्ये ६०० दशलक्ष रुपयांचा फ्रेश इश्यु असून ९०,१५,००० शेअर्स  ऑफर फॉर सेल  द्वारे  विक्री करण्यात येतील,

आयपीओ (IPO) उद्दीष्टे

 हेरंबा इंडस्ट्रीज च्या आयपीओची उद्दीष्टे

१) व्यवासायासाठी वर्किंग कॅपिटल उभे करणे.

२) कॉर्पोरेट उद्दीष्टे पुर्ण करणे. आणी त्याचा खर्च भागवणे.

आयपीओ (IPO) तपशील.

आयपीओ खुला होण्याची तारीख२३ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख२५ फेब्रुवारी २०२१
साईज६०० दशलक्ष
लॉट साईज२३
प्राईज बँड₹६२६  –  ₹६२७
फेस व्हॅल्यू₹ १०
एक्सचेंज NSE – BSE

आयपीओ (IPO) वेळापत्रक (अंदाजे).

आयपीओ खुला होण्याची तारीख२३ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख२५ फेब्रुवारी २०२१
अलॉटमेंट२ मार्च २०२१
रिफंड३ मार्च २०२१
शेअर्स डिमॅटमध्ये क्रेडीट होण्याची तारीख४ मार्च २०२१
लिस्टींग५ मार्च २०२१

बुक रनिंग लीड मॅनेजर्स

१) एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस  लिमिटेड
२)बाटलीवाला अँड करानी सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

ऑफर रजिस्ट्रार

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनीचा पत्ता

    रजिस्टर्ड ऑफिस

हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड (Heranba Industries Limited)

  प्लॉट नं १५०४/१५०५/१५०६/१,

  फेज ३, वापी, वलसाड, गुजरात

  पिन. ३९६१९५

कॉर्पोरेट  ऑफिस

हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड (Heranba Industries Limited)

१०१/१०२  कांचनगंगा, फॅक्टरी लेन,

बोरिवली (पश्चिम), मुंबई

पिन.  ४०००९२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *