gland-pharma-img

Gland pharma Limited IPO

ग्लॅंड फार्मा आयपीओ

ग्लॅंड फार्मा  या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीचा आयपीओ (IPO) येत आहे. येत्या ९ तारखेस  कंपनीचा आयपीओ खुला होत आहे. ग्लॅंड फार्मा ही हैद्राबाद येथे २० मार्च १९७८ साली ग्लॅंड फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्थापन करण्यात आली. १९९५ साली कंपनी ग्लॅंड फार्मा लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनी मध्ये रूपांतरित करण्यात आली. कंपनीचे रजिस्टर्ड आणि कॉर्पोरेट मुख्यालय हैद्राबाद येथे आहे.

कंपनी उद्दिष्टे .

  • हर्बल, बॅक्टेरिओलॉजीकल,बायोलॉजिकल, केमिकल, औषधीय कंपाऊंडस बनवणे आणि विक्री करणे.
  • ऑर्थोपेडिक, सर्जिकल उपकरणे, कृत्रिम पाय, कृत्रिम डोळे आणि कृत्रिम हात यांचे उत्पादन, तसेच, केमिकल, इलेक्ट्रिकल, फोटोग्राफीक आणि  वैज्ञानिक उपकरणे, लॅब उपकरणे, बनवणे आणि त्यांची  विक्री करणे.

कंपनीचा व्यवसाय.

ग्लॅंड फार्मा कंपनी विविध जेनेरीक इंजेक्टेबल्स मोठ्या प्रमाणावर बनवते. Oncology (कॅन्सरचिकीत्सा ), Ophthalmic (नेत्रचिकित्सा) या मध्ये वापरण्यात येणारे इंजेक्टेबल्स कंपनी बनवते. तसेच कंपनीच्या  प्रॉडक्ट  पोर्टफोलियोमध्ये  विविध उपचारामध्ये वापरण्यात येणारे इंजेक्टेबल्स आहेत.  कंपनी इंजेक्टेबल्स व्हाईल, अँप्यूल्स,  ड्रॉप्स, प्रिफिल्ड् सिरींजेस, लिक्विड बॅग्स, बनवते. याशिवाय अँटी-डायबेटीक, अँटी-इनफेकटीव्ह, अँटी-मलेरियल, अँटी-निओप्लॅस्टिक्स,ब्लड-रिलेटेड (रक्त संबंधी ),कार्डियाक, हार्मोन्स, या व आशा अनेक औषधाना लागणारी इंजेकटिबल्स बनवते. तसेच कंपनी api सुद्धा बनवत आहे.  

कंपनीच्या भारतात डिंडिगल, विशाखापटणम, पाशमायलाराम, या ठिकाणी ७ मॅन्यूफॅकच्युरिंग फॅसिलिटीज आहेत. या मॅन्यूफॅकच्युरिंग फॅसिलिटीज ना USFDA, MHRA, DMA,ANVISA, TGA,AGES,GUB या सारख्या परदेशी ड्रग रेग्युलेटर्स कडून मान्यता मिळाली आहे.

कंपनी देशाबाहेर B2B  मॉडेल वापरत असून  ६० पेक्षा अधिक देशात विक्री करत आहे तर भारतात B2C बिजनेस मॉडेल वापरत आहे. कंपनीच उत्पादन अमेरिका,कॅनडा,युरोप, ऑस्ट्रेलिया व इतर परकीय देशात विकले जातात. सेजंट फार्मास्युटीकल्स,ॲपोटेक्स, ॲथनेक्स  फार्मास्युटीकल डिव्हिजन, हे कंपनीचे ग्राहक आहेत.    

वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो, उत्तम बिजनेस मॉडेल, मान्यताप्राप्त मॅन्यूफॅकच्युरिंग फॅसिलिटीज, उत्तम रेकॉर्ड, अनुभवी व्यवस्थापन या कंपनीच्या जमेच्या बाजू आहेत.

कंपनी फायनान्स

 मार्च २०२०मार्च २०१९मार्च २०१८
एकूण आय२७७२४.०८२१२९७.६७१६७१६.८२
एकूण खर्च१७७९५.४२१४२३४.८९११७०२.१७
कर वजा जाता फायदा७७२८.५८४५१८.५६३२१०.५१
(आकडे दशलक्ष रुपयात)

प्रोमोटर्स

फोसून सिंगापूर ही कंपनीची प्रमुख प्रोमोटर असून ही कंपनीकडे  ग्लॅंड फार्मा मधील ७४ % हिस्सा आहे. ग्लॅंड सेल्सस, एंपॉवर ट्रस्ट, निलय ट्रस्ट, हे प्रोमोटर आहेत.   

आयपीओ(IPO)

आयपीओचे उद्दिष्ट

  • खेळते भांडवल उभे करणे.
  • भांडवली खर्चासाठी  पैसा उभा करणे.
  • कॉर्पोरेट उद्दिष्ट पूर्ण करणे.

आयपीओ ऑफर.

९ तारखेस ओपन होत असलेला हा इश्यू बूक बिल्ट इश्यू आहे. या मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल असणार आहे. ४,३१ ९६,९६८ शेअर्स या आयपीओ  द्वारे गुंतवणूकदारास उपलब्ध असतील. या मध्ये ८३,३३,३३३ शेअर्सचा फ्रेश इश्यू तर ३,४८,६३,६३५ शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध असतील.

ऑफर फॉर सेल अंतर्गत फोसून सिंगापूर १,९३,६८,६८६ शेअर्स, ग्लॅंड सेल्सस १,००,४७,४३५ शेअर्स, एंपॉवर ट्रस्ट ३५,७३,०१४ शेअर्स, निलय ट्रस्ट १८,७४,५००शेअर्स विकणार आहेत.

ग्लॅंड फार्मा आयपीओ(IPO)

आयपीओ तारीख९ नोव्हेंबर २०२० -११  नोव्हेंबर २०२०
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज४,३१ ९६,९६८
फेस व्हॅल्यू₹१
प्राइज बॅंड₹१४९० – ₹१५००  
लॉट१०  
लिस्टिंग एक्स्चेंजBSE-NSE

 ग्लॅंड फार्मा आयपीओ (IPO) वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख९ नोव्हेंबर २०२०
आयपीओ बंद होण्याची तारीख११  नोव्हेंबर २०२०
अलॉटमेंट तारीख१७ नोव्हेंबर २०२०
रिफंड१८ नोव्हेंबर २०२०
डिमॅट ट्रान्सफर तारीख१९ नोव्हेंबर २०२०
लिस्टिंग तारीख२० नोव्हेंबर २०२०

IPO लीड मॅनेजर्स

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड.
सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
हैतोंग सेक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड.

IPO रजिस्ट्रार

लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *