form-img

फॉर्म १६ (Form 16 ) काय असतो?

फॉर्म १६ (Form 16) काय असतो?

मार्च महिना उलटून गेला की  सुरुवात होते नव्या आर्थिक वर्षाची. मग  हालचाल सुरू होते ती आयकर रिटर्न भरण्याची. बँक स्टेटमेंट्स, प्रीमियम भरलेल्या पावत्या हे आणि  असे अनेक कागद गोळा करायला लोक सुरुवात करतात. बहुतेक वेळा यात  एक फॉर्म असतो; फॉर्म १६ (Form 16),  तर हा फॉर्म १६ काय असतो? त्यात काय माहिती असते? त्याचे काय महत्त्व आहे? हे  आज आपण पाहूया.

फॉर्म १६ (From 16)

फॉर्म १६ हे  एक आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स ॲक्ट  अंतर्गत  येणाऱ्या सेक्शन २०३ नुसार पगारातून मिळणाऱ्या  उत्पन्नावर  कर (TDS) वसूल करण्यात आल्यास  जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र असते. फॉर्म १६ हा एम्प्लॉयर द्वारे  कर्मचाऱ्यास जारी करण्यात येतो. या मध्ये उत्पन्नातून वसूल करण्यात आलेल्या कराबद्दलची (TDS) माहिती सविस्तर पणे देण्यात आलेली असते.

पार्ट A

या फॉर्म चे दोन भाग असतात पार्ट A आणि पार्ट B. पार्ट A मध्ये एम्प्लॉयरचे नाव,पत्ता, एम्प्लॉयरचा  पॅन (PAN),  टॅन (TAN) अशी एम्प्लॉयरची माहिती तर  कर्मचाऱ्याचे नाव, पत्ता आणि त्याचा  पॅन (PAN) अशी  कर्मचाऱ्याची (Employee) माहिती असते. याशिवाय, असेसमेंट इयर,  कर्मचार्यास देण्यात आलेला पगार आणि त्यातून एम्प्लॉयरद्वारा वसूल करण्यात आलेला कर (TDS), आणि सरकारला भरण्यात आलेला कर (TDS) याची एम्प्लॉयरद्वारा  प्रमाणित माहिती असते.

Form 16 Part  A alt-img
Form 16 Part A

पार्ट B

 पार्ट B मध्ये कर्मचाऱ्यास देण्यात आलेल्या पगाराचे सेक्शन १७(१ ), सेक्शन १७(२  )आणि  सेक्शन १७(३ ) नुसार  विच्छेदित विवरण असते. तसेच विविध भत्ते आणि सेक्शन १० नुसार देण्यात आलेली सूट यांचा उल्लेख असतो. याशिवाय फॉर्म १६ च्या पार्ट B मध्ये वजावटी साठी  विविध  इन्कम टॅक्स ॲक्टच्या विविध सेक्शन्स नुसार वजावट घेण्यासाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकी , योगदान आणि त्यावर मिळालेली  वजावट  (Deductions) याचा उल्लेख  फॉर्म १६ च्या पार्ट B मध्ये असतो.

Form 16 Part B Page 1
Form 16 Part B Page 2

 उदाहरणार्थ.

१) सेक्शन (८० C) –इनश्यूरन्स प्रीमियम, PPF मधील योगदान, या करिता घेतलेली वजावट

२ ) सेक्शन (८० CCC) पेन्शन फंडातील  योगदान या करिता घेतलेली वजावट

३) सेक्शन (८० CCD)1 नुसार पेन्शन स्कीम साठी योगदान या करिता घेतलेली वजावट

४) सेक्शन (८० CCD)1B नुसार NPS पेन्शन स्कीम साठी योगदान या करिता घेतलेली वजावट

५) सेक्शन (८०CCD)(2 ) एम्प्लॉयरद्वारा देण्यात आलेले पेन्शन स्कीम साठी योगदान या करिता घेतलेली वजावट                           

६) सेक्शन (८० D) हेल्थ स्कीम साठी  योगदान या करिता घेतलेली वजावट

७) सेक्शन (८० E) उच्च शिक्षणासाठी  घेतलेल्या कर्जावर दिलेले व्याज या करिता घेतलेली वजावट

८) सेक्शन (८० G) देणगी करिता घेतलेली वजावट

९) सेक्शन (८० TTA) बचत खात्यातील रकमेवर मिळालेले व्याज या करिता घेतलेली वजावट

या फॉर्मचा उपयोग टॅक्स रिटर्न भरण्यासाठी होतो.  वसूल करण्यात आलेला टॅक्स (TDS), भत्त्यावर मिळणारी सूट, आणि वजावट यांचा वापर करून  टॅक्स रिटर्न भरता येतो.

एका आर्थिक वर्षात जर कर्मचाऱ्याने जर एकाच एम्प्लॉयर कडे काम केले असेल तर त्याला त्या एम्प्लॉयरकडून एक फॉर्म १६ घेऊन टॅक्स रिटर्न भरता येऊ शकतो पण  जर कर्मचाऱ्याने जर एका  पेक्षा जास्त एम्प्लॉयर्स कडे काम केले असेल तर त्याल त्या एम्प्लॉयर्सकडूनही  फॉर्म १६ घ्यावा लागेल.

एम्प्लॉयरद्वारे  आर्थिक वर्ष समाप्ती नंतर १५ जूनपूर्वी हा फॉर्म त्यांच्या कर्मचाऱ्यास जारी करणे बंधनकाक असते. फॉर्म १६ च्या मदतीने कर्मचाऱ्यास त्याचा आयकर परतावा भरणे सहज सोपे होऊन जाते. परंतू, हा फॉर्म न मिळाल्यास त्यांची मागणी करण्याचा कर्मचाऱ्यास अधिकार आहे. एम्प्लॉयर हा फॉर्म आयकर विभागाच्या ट्रेसेस प्रणालीद्वारे जनरेट करून तो कर्मचाऱ्यास देऊ शकतो.

फॉर्म १६ जर कर्मचाऱ्यास देण्यात आला नाही तर एम्प्लॉयरला  प्रतिदिन १०० दंडाची तरतूद आयकर कायद्यात आहे. परंतू जर एखाद्या कर्मचाऱ्याचा TDS पगारातून कापून घेतला गेला नसला तर एम्प्लॉयर बहुतेक वेळा फॉर्म १६ देत नाही.

पेन्शन धारकासाठी फॉर्म 16

पेन्शनधारक व्यक्ति फॉर्म १६ ज्या बँकेत त्याची पेन्शन जमा होते त्या बँकेकडून प्राप्त करू शकतात. तसेच पेन्शन धारक बँकेकडे अर्ज करून पेन्शन पेड सर्टिफिकेट मागू शकतो.

Form 16 सारांश

  • फॉर्म १६ हा नोकरदार व्यक्तीस देण्यात येतो.
  • दर साल १५ जून पूर्वी हा टॅक्स डिडक्टर कडून हा जारी केला जातो.
  • एम्प्लॉयर, एम्प्लॉयी यांची माहिती, एम्प्लॉयीचा  एकूण पगार, TDS, सूट, वजावट, यांचा उल्लेख या  फॉर्म १६ मध्ये असतो.
  • टॅक्स रिटर्न भरण्यास आणि पडताळा करण्यास याची मदत होते.

TDS – टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स

पॅन – परमनंट अकाऊंट नंबर

टॅन – टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाऊंट नंबर.

Disclaimer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *