Easy Trip Planners IPO

10. Easy Trip planners IPO

इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड

आयपीओ अर्थात इनिशिअल पब्लिक ऑफर; ज्याद्वारे कंपनी आपले शेअर्स पब्लिक इन्व्हेस्टर्सना ऑफर करून भांडवल उभे करते. बर्‍याच कंपन्या अलिकडे आयपीओ आणत आहेत. या वर्षात आतापर्यंत आलेल्या बहुतेक सर्वच आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०२१ मध्ये येणार्‍या आयपीओच्या यादी मध्ये एका नव्या कंपनीचे नाव जोडले जात आहे. Easy Trip planners Limited (इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड) हि कंपनी आपला आयपीओ (IPO) आणत आहे. कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) डिसेंबर २०१९ मध्ये सादर केले होते. कंपनीचा आयपीओ येत्या ८ तारखेस खुला होत आहे.

कंपनीची माहिती

इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड हि कंपनी हॉस्पिटॅलिटी सेक्टरशी निगडित कंपनी असून ट्रॅव्हल सर्व्हिसेस इंडस्ट्री मध्ये व्यवसाय करते. कंपनिची स्थापना ४ जुन २००८ रोजी इजी ट्रिप प्लॅनर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने दिल्ली येथे करण्यात आली. पुढे १२ एप्रिल २०१९ रोजी कंपनीचे इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत रुपांतर करण्यात आले. श्री. निशांत पिट्टी, श्री. रिकांत पिट्टी आणि श्री. प्रशांत पिट्टी हे कंपनीचे प्रमोटर आहेत.

कंपनीची व्यवसाय

कंपनी भारतातील प्रमुख ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी पैकी एक म्हणून ओळखली जाते. इजी ट्रिप प्लॅनर्स ग्राहकांना वेगवेगळे ट्रॅव्हल रिलेटेड प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करते. कंपनी प्रवाशांकरिता एंड टू एंड सोल्युशन्स पुरवते ज्या मध्ये एअरलाईन तिकिट, रेल्वे तिकिट, टॅक्सी, हॉटेल बुकिंग, हॉलिडे पॅकेज, यांचा समावेश आहे. यासोबतच कंपनी व्हिसा प्रोसेसिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स यासारख्या व्हॅल्यु ॲडेड सर्व्हिसेस पुरवते. कंपनी बिझनेस टू बिझनेस टू कंज्युमर (B2B2C) आणि बिझनेस टू कंज्युमर (B2C) आणि बिझनेस टू एंटरप्राईज (B2E)अशा बिझनेस मॉडेल्सवर व्यवसाय करत आहे.

कंपनी www.easemytrip.com आणि www.easemytrip.in या वेबसाईट तसेच easemytrip या अँड्रॉइड आणि आयओएस वर चालणार्या ॲप द्वारे आपले प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे. कंपनी ४०० भारतीय आणि परदेशी एअरलाईन्स सोबत काम करत आहे. तसेच भारतातील आणि परदेशातील१०,९६,४०० हॉटेल्स, मोठ्या शहरातील टॅक्सी सर्व्हिसेस, बस सर्व्हिसेस, यांचे बुकिंग ग्राहक कंपनी मार्फत करू शकतो.

कंपनीकडे भारतातील प्रमुख शहरात ५२७५२ रजिस्टर्ड ट्रॅव्हल एजंट्स आहेत. कंपनीचे भारतात दिल्ली, नोइडा, बेंगलोर, हैद्राबाद, मुंबई येथे तर परदेशात दुबई, लंडन, सिंगापुर येथे ऑफिसेस आहेत. कंपनीमध्ये सध्या ४७७ कर्मचारी आहेत.

कंपनीची वैशिष्टे

भारतातील प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक कंपनी.

आधुनिक तंत्रद्न्यानाचा वापर

उत्तम ट्रॅक रेकॉर्ड.

विस्त्रृत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क

अनुभवी व्यवस्थापन

ही इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड ची वैशिष्टे आहेत.

फायनान्शिअल्स


३१ डिसेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स३५६९.६६२८२३.३७२४३०.८८१८०२.८९
रेव्हेन्यु८१५.७२१७९७.२४१५११.११११३५.७४
प्रॉफिट (PAT)३११.०९३४६.४८२३९.९३०.३०

(सर्व आकडे दशलक्ष रुपयात)

IPO

इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडचा आयपीओ हा येत्या ८ मार्च रोजी खुला होत असून १० मार्च पर्यंत हा इश्यू खुला असणाार आहे. कंपनीचा ₹५१०० दशलक्ष चा हा आयपीओ बुक बिल्ट इश्यू आहे.

आयपीओचा उद्देश

बाजारात कंपनीच्या शेअर्सचे लिस्टींग करणे आणि लिस्टींंगचे फायदे मिळवणे.

शेअर्स विकणे.

आयपीओ डिटेल्स

कंपनी – इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड

सेक्टर – हॉस्पिटॅलिटी

इंडस्ट्री – ट्रॅव्हल सर्व्हिसेस

आयपीओचा तपशील

आयपीओ खुला होण्याची तारीख८ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१० मार्च २०२१
साईज५१०० दशलक्ष
लॉट साईज२६
प्राईज बँड₹१८६ – ₹१८७
फेस व्हॅल्यू₹ २
एक्सचेंजNSE – BSE

महत्वाच्या तारखा

आयपीओ खुला होण्याची तारीख८ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१० मार्च २०२१
बेसिस अलॉटमेंट१६ मार्च २०२१
रिफंड१७ मार्च २०२१
शेअर्सचे डिमॅटमध्ये क्रेडीट१८ मार्च २०२१
लिस्टींग१९ मार्च २०२१

बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM)

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड.
JM फायनान्शिअल लिमिटेड.

रजिस्ट्रार (Registrar)

के-फिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीचा पत्ता

Easy Trip planners Limited (इजी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड)

२२३, FIE प्रतापगंज इंडस्ट्रीअल एरिया,

ईस्ट दिल्ली, दिल्ली.

पिन- ११००९२

इ-मेल -: emt.secretarial@easemytrip.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *