टायगर इलेक्ट्रिक: भारतातील पहिलाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर !
सोनालिका टायगर इलेक्ट्रिक
महाग मर्यादित इंधन, प्रदूषण, आणि त्या प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम यामुळे जग इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. जगभरात टेस्ला या इलेक्ट्रिक गाडीचे नाव तर सर्वानाच परिचयाचे आहेच. भारतातही महिंद्रा इ-व्हेरिटो, टाटा नेक्सॉन इव्ही, अशा कार्स बाजारात आलेल्या आहेत. पॅसेंजर कार्स नंतर इलेक्ट्रिक ट्रक्स्, इलेक्ट्रिक बसही बाजारात आल्या आहेत. अशातच भारतात नुकताच एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सादर करण्यात आला आहे.
सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड या होशीयारपूर, पंजाब स्थित भारतीय फार्म इक्विपमेंट तयार करणाऱ्या कंपनीने देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉंच केला आहे. कंपनी इलेक्ट्रिक टायगर (Tiger Electric) या ब्रॅंड नेम खाली हे ट्रॅक्टर विकत आहे, या ट्रॅक्टर मध्ये ११ kw ची मोटर देण्यात आलेली असून २५.५ kwh ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आलेली आहे.

एक चार्ज मध्ये हा ट्रॅक्टर ८ तास काम करू शकतो. ट्रॅक्टरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास ८ तास लागतात. तर फास्ट चार्जर द्वारे हा ४ तासात चार्ज करता येवू शकतो. या ट्रॅक्टरचे डिजाइन युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेले असून उत्पादन भारतात करण्यात आलेले आहे. ट्रॅक्टरमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी भारतातच बनवण्यात आलेली आहे . ट्रॅक्टरचा टॉप स्पीड २४.९ किमी. प्रतितास इतका देण्यात आलेला आहे. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्यास सर्वसामान्य डिजेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच आहे.
वैशिष्ठ्ये
इफीशिअंट पॉवरफुल मोटर,
उत्तम टॉर्क
लॉंग लाईफ बॅटरी
डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल
कॉम्पेटिटीव्ह प्राइज
ही या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत.
किंमत
कंपनीने या ट्रॅक्टरची किंमत ५.९९(एक्स शोरूम ) लाख ठेवली आहे. इंजिन नसल्यामुळे त्याचा मेंटेनन्स, इंधन याच्यावर होणाऱ्या खर्चात बचत होणार असून शेतकाऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर मोठा फायदेशीर ठरू शकतो. कंपनी कडून याची बूकिंग चालू करण्यात आली आहे.
पर्यावरण पुरक पर्याय. शेतकरी बंधू साठी