promissory note

कमर्शिअल पेपर्स म्हणजे काय ?

जर आपण फायनान्शियल मार्केट ट्रॅक करत असाल तर आपण आपण ऐकले असेल की अमुक एखाद्या कंपनीने कर्मशिअल पेपर इश्यू केले. अमुक कंपनीने कर्मशिअल पेपर री-पे केले. तर हे कमर्शिअल पेपर काय असतात? त्यांचा काय उपयोग असतो? कंपनी कसा वापर करतात? ही आपण इथे थोडक्यात पाहू

कर्मशिअल पेपर ही एक डेट इन्स्ट्रुमेंट आहे. कमर्शिअल पेपर्स ही एक प्रकारचे प्रॉमिसरी नोट आहे ज्याचा वापर अल्प मुदतीचे कर्ज (Short term loan) उभा करण्यासाठी करण्यात येतो. हे एक अन-सिक्युअर्ड लोन (कोणतेही तारण न देता घेण्यात आलेले कर्ज)असते. कर्मशिअल पेपर चा वापर कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूटस यांच्या कडून कमी मुदतीचे कर्ज घेण्यासाठी केला जातो. कमर्शिअल पेपर जारी करणाऱ्या कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून कमर्शिअल पेपर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास व्याज दिले जाते. कर्मशिअल पेपर्स हे गुंतवणूकदारास दर्शनी मूल्या पेक्षा कमी किमतीत (Discount Rate)जारी केले जातात.

इतिहास

कर्मशिअल पेपर्सची संकल्पना ही नवी नाही. अंदाजे अमेरिकन गृहयुद्धाच्या समाप्ती नंतर १५० वर्षापूर्वी न्यूयॉर्क मध्ये तेथील व्यापाऱ्यांनी आपल्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी कमर्शिअल पेपर जारी करण्यास सुरुवात केली. भारतात सरकारच्या आर्थिक उदारीकरण धोरणा नुसार १९९० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची दारे खुली झाल्या नंतर भारतात कर्मशिअल पेपर्स जारी करण्यास सुरुवात झाली.

तपशील (डिटेल्स)

कर्मशिअल पेपर्स ही मनी मार्केट मधील डेट इन्स्ट्रूमेंट्स आहेत. वर उल्लेख केल्या प्रमाणे कंपन्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटस यांच्या कडून अल्प मुदतीचे कर्ज (Short term loan) उभारणी साठी यांचा वापर केला जातो. असे असले तरी ज्या कंपनीचे क्रेडीट रेटिंग (पत मानक ) चांगले आहे अश्या कंपन्या ही कमर्शिअल पेपर्स जारी करू शकतात. भारतात कमर्शिअल पेपर जारी करण्यासाठी ICRA, CARE, FITCH, अशा रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून मान्यता प्राप्त क्रेडिट रेटिंग संस्था कडून पत मानांकन असणे आवश्यक असते. कमर्शिअल पेपर्सच्या व्यवहारावर भारतीय रिजर्व बँक, सेबी अशा संस्था  रेग्युलेटरी बॉडी म्हणून काम पाहत असतात.

वर उल्लेख केल्या प्रमाणे कमर्शिअल पेपर्स जारी करून उभे करण्यात आलेले कर्ज ही बहुतेक वेळा अन-सिक्युअर्ड लोन असते. या साठी कोणतेही तारण (Collateral) ठेवण्यात आलेले नसते. परंतू  यांचा एक दूसरा प्रकार असतो ज्याला ॲसेट बॅक्ड कमर्शिअल पेपर्स असे म्हणतात ज्या मध्ये कमर्शिअल पेपर जारी करणाऱ्या कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांनी तारण (Collateral)  दिलेले असते. बहुतेक वेळ बँक्स,फायनान्शियल इन्स्टिट्यूट अशा संस्था ॲसेट बॅक्ड कमर्शिअल पेपर्स जारी करतात.

मुदत  

अल्प मुदतीचे कर्ज उभे करण्यासाठी वापर होत असल्याने  कमर्शिअल पेपरची मुदत ही १ वर्षा पेक्षा कमी असते.ही मुदत ७  दिवस ते ३६५ दिवस (१ वर्ष) इतकी असू शकते. 

Burma 1926 Promissory Note

कोण जारी करू शकतो?

कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट  कमर्शिअल पेपर्स जारी करू शकतात. परंतू त्या साठी काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. कमर्शिअल पेपर्स जारी करणाऱ्या कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटची  पत कमीत कमी ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कंपनीचे वर्किंग कॅपिटल (खेळते भांडवल ) ४ कोटी पेक्षा जास्त असावे. कंपनीच्या आर्थिक ताळेबंदानुसार  करंट रेशो  १.३३ इतका असावा.  क्रेडिट रेटिंग P1/A1 असावे. वरील अटी आणि शर्तीची पूर्तता करणाऱ्या कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कमर्शिअल पेपर जारी करू शकतात.याशिवाय काही रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमांचे पालन कमर्शिअल पेपर्स जारी करणाऱ्या कंपनीस करावे लागते

उदा. कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट  कमर्शिअल पेपर्स जारी करण्यासाठी रिजर्व बँक ऑफ इंडिया कडे अर्ज करावा लागतो. ज्या बँके सोबत कमर्शिअल पेपर्स जारी करणाऱ्या कंपनीचे उत्तम क्रेडिट रिलेशन्स आहेत त्याच बँके मार्फत कंपनी  कमर्शिअल पेपर्स जारी करू शकते.  क्रेडिट रेटिंग २  महिन्यापेक्षा जुने असतं कामा नये.

कोण इन्व्हेस्ट करू शकतो.

भारतात इंडिव्हिज्यूअल्स , बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, कंपनीज, कॉर्पोरेट बॉडी, FII,DII, कमर्शिअल पेपर मध्ये गुंतवणूक करू शकतात. कमर्शिअल पेपर कमीत कमी ५००००० रुपये आणि च्या पटीत जारी केले जाऊ शकतात.  रिटेल इन्व्हेस्टर्स या कमर्शिअल पेपर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाद्वारे या पेरपस मध्ये गुंतवणूक करू शकतात. FII ना भारतात कमर्शिअल पेपर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सेबी ची परवानगी घेणे आणि सेबीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

फायदे

जारी करणाऱ्यास फायदे

 • कमी इंटरेस्ट रेट- कमर्शिअल पेपर जारी केल्यावर जारी करणाऱ्यास द्यावे लागणारे व्याज हे  बँकेकडून उभे करण्यात आलेल्या कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजा पेक्षा कमी असते त्यामुळे  मुळे  हे कर्ज स्वस्त असते.
 • शॉर्ट टर्म लोन- अल्प मुदतीचे कर्ज उभे करता सहज शक्य होते.
 • कमर्शिअल पेपर्स कंपनीस लिक्विडिटी देतात
 • या साठी कोणतेही तारण ठेवावे लागत नाही.
 • इन्व्हेस्टर्स आणि क्रेडिटर्स याच्या मध्ये जारी करणाऱ्या कंपनीची फायनान्शियल इमेज बिल्डिंग

   गुंतवणूक करण्यास फायदे

 • गुंतवणूकीवर उत्तम रिटर्न- कर्मशिअल पेपर्स आकर्षक व्याज देतात. दर्शनी मूल्या पेक्षा कमी किमतीत (Discount Rate) खरेदी केले जात असल्याने गुंतवणूक दारास उत्तम परतावा देऊ शकतात.   
 • पोर्टफोलियो डायव्हर्सिफिकेशन
 • ७दिवस्त ते १ वर्षाची मुदत असल्याने कमर्शिअल पेपर गुंतवणूकदारास फ्लेक्सीबिलिटी देतात.
 •  लिक्विडिटी- गुंतवणूकदार  कमर्शिअल पेपर मुदतपूर्व डिलर्स ना विकून या मधून बाहेर पडू शकतात.

तोटे

 सदर कमर्शिअल पेपर्स जारी करून उभे करण्यात आलेले कर्ज  हे अन-सिक्युअर्ड लोन असते. यासाठी तारण ठेवलेले नसते. जर कमर्शिअल पेपर्स जारी करणारी कंपनी अथवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट ही कर्ज परत करू शकले नाहीत तर गुंतवणूक दाराचे नुकसान होऊ शकते.

कमर्शिअल पेपर्सचे री-पे करण्यासाठी जारी करणाऱ्या कंपनीस ग्रेस पिरेड म्हणजेच मुदतवाढ देण्यात येत नाही.

कमर्शिअल पेपर्स NRI ना जारी करता येत नाहीत.  

सारांश

 • कमर्शियल पेपर्स ही एक शॉर्ट टर्म लोन  उभे करण्यासाठी कंपनी, वित्तीय संस्था यांच्या द्वारे केला जातो.
 • या साठी तारण गरजेचे नसते.
 • मुदत काही दिवसापासून 1 वर्षापर्यंत असू शकते.
 • दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीत  जारी केले जातात.

Disclaimer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *