केमकॉन आयपीओ /Chemcon IPO
केमकॉन या केमिकल बनवणाऱ्या कंपनीचा IPO येत्या २१ तारखेस आहे. केमकॉन १९८८ साली स्थापन झालेली हि ISO ९००१:२०१५ आणि ISO १४००१:२०१५ मानांकित कंपनी असून कंपनीचे गुजराथ मध्ये बडोद्याजवळ मंजूसार इथे प्रकल्प आहे.
केमकॉन फार्मास्युटिकल कंपन्यांना औषध निर्मिती साठी लागणारे केमिकल इंटरमिजेट्स, तसेच तेल उद्योगात (ओलिफाईड सेगमेंट ) लागणारे केमिकल्स बनवते. ब्रोमिनिझेशन आणि हायड्रोक्लोरिनेशन या प्रक्रिया करून या कंपनीत विविध रसायने बनवली जातात.
हेटेरो लॅब्स,लँटेक फार्मा, अरबिंदो फार्मा, या सारख्या नामांकित औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या केमकॉनच्या ग्रहात आहेत. तसेच श्री राधा ओव्हरसीज, युनिव्हर्सल ड्रिलिंग फ्लुईड्स, या ओलिफाईड सेगमेंट मधील कंपन्या ग्राहक आहेत.
कंपनीचे प्रोडक्ट्स भारतात तसेच, भारताबाहेर अमेरिका,चीन,जपान,मलेशिया आणि अझरबैजान इथे एक्स्पोर्ट होतात. मंजूसार इथे कंपनीचे ५ कार्यान्वित प्रकल्प, ३ स्वमालकीचे आणि २ भाडेतत्त्वावर गोदाम आहेत.
कंपनीचा व्यावसायिक सारांश
* स्थापना -१९८८
* सेक्टर – केमिकल
* प्रॉडक्टस् -ओलिफाईड केमिकल्स – कॅल्शिअम ब्रोमाइड लिक्विड.
– कॅल्शिअम ब्रोमाइड पावडर.
– सोडिअम ब्रोमाइड सोल्युशन.
– झिंक ब्रोमाइड सोल्युशन.
– फार्मास्युटिल केमिकल्स – हेक्झामिथाईल डायसिलिझेन.
– क्लोरोमिथाईल आयसोप्रोपाईल कार्बोनेट.
– ट्रायमिथाईल क्लोरोसिलेन.
– हेक्झामिथाईल डायसिलोक्झेन.
– सिलेन्स – हेक्झामिथाईल डायसिलाझेन.
– ट्रायमिथाईल क्लोरोसिलेन.
– हेक्झामिथाईल डायसिलोक्झेन.
– काँट्रॅक्ट मॅन्यु्फॅक्च्युरिंग
IPO डिटेल्स
कंपनी चा IPO २१ तारखेस खुला होत आहे.
IPO ची उद्दिष्टे
१) उद्योग विस्तारासाठी भांडवल उभे करणे.
२)व्यवसायासाठी खेळ;ते भांडवल उभे करणे.
३) कंपनीचे कार्पोरेट उद्दिष्ट साध्य करणे.
IPO सारांश.
IPO खुला होण्याची तारीख | २१ सप्टेंबर २०२० |
IPO बंद होण्याची तारीख | २३ सप्टेंबर २०२० |
इश्यु प्रकार. | बूक बिल्ट इश्यू |
इश्यु साईज | ९३५२९४० समभाग |
फ्रेश ईश्यु. | ४८५२९४० |
ओएफएस (OFS) | ४५००००० |
फेस व्हॅल्यू | ₹१० प्रति समभाग. |
प्राईस बॅंड | ₹३३८-₹३४०. |
मार्केट लॉट | ४४ |
मिनिमम ऑर्डर क्वांटिटी | ४४ |
लिस्टींग एक्सचेंज. | BSE ,NSE |
IPO वेळापत्रक
इश्यु खुला होण्याची तारीख | २१ सप्टेंबर २०२० |
इश्यु बंद होण्याची तारीख | २३ सप्टेंबर २०२० |
अलॉटमेंट | २८ सप्टेंबर २०२० |
Asba रिफंड | २९ सप्टेंबर २०२० |
शेअर्सचे डिमॅटमध्ये हस्तांतरण | ३० सप्टेंबर २०२० |
लिस्टिंग आणि ट्रेडिंग | १ ऑक्टोबर २०२० |
इन्व्हेस्टर्स प्रकारानुसार ऑफर साईज.
एकूण ऑफर साईज पैकी अलॉटमेंट साठी उपलब्ध (%)
QIB (क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स):- ५०
NII(नॉन- इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स):- १५
RII(रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स):- ३५
रजिस्ट्रार:- लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
लीड मॅनेजर्स :- लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
:- इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड .