Burger King India Logo

Burger King IPO

बर्गर किंग आयपीओ

उद्योग विश्वासाठी २०२० ही वर्ष फारसे चांगले गेले नसले तरी या वर्षात आलेल्या बहुतेक आयपीओ ना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वर्षाखेर होताना बर्गर किंग इंडिया कंपनी आयपीओ(IPO) आणत आहे. बर्गर किंग (Burger King) ही एक भारतातील मोठ्या रेस्टॉरंट चेन पैकी एक  आहे. कंपनीची स्थापना ११ नोव्हेंबर २०११ रोजी भारतात बर्गर किंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने झाली. २५ सप्टेंबर २०१९ रोजी कंपनी बर्गर किंग इंडिया लिमिटेड या नावाने रजिस्टर झाली आणि पब्लिक लिमिटेड कंपनी मध्ये रूपांतरण करण्यात आले.  कंपनीचे  रजिस्टर्ड ऑफिस मरोळ, मुंबई येथे आहे.  

मिशन

भारतात रेस्टॉरंट ईटिंग हौसेस, कँटिन, फास्ट फूड आउटलेट, यांचा प्लॅनिंग, विकास आणि ऑपरेट करणे, तसेच इतर फ्रँचायजी देणे आणि कँटिन, फास्ट फूड आउटलेट, यांचा प्लॅनिंग विकास आणि ऑपरेट करणे व लायसन्स तत्वावर  चालविण्यास देणे.

व्यवसाय

बर्गर किंग ही एक भारतातील मोठ्या क्वीक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR) चेन पैकी एक आहे. कंपनी भारतात बर्गर किंग या ब्रॅंडची मास्टर फ्रँचायजी आहे. १९५४ साली अमेरिकेत स्थापना झालेल्या या कंपनीने भारतातील स्वत:चे पहिले  रेस्टॉरंट नोव्हेंबर २०१४ मध्ये उघडले. सध्या कंपनीचे  भारतात १६ राज्यात ४७ शहरात २१६ स्व: मालकीचे रेस्टॉरंट्स असून आणि ८ सब- फ्रँचायज्ड रेस्टॉरंट्स आहेत. कंपनीचे रेस्टॉरंट्स प्राइम लोकेशन्स वर आहेत.

  • एक्सक्लूजिव्ह मास्टर फ्रँचायजी राईट्स
  • तरूण ग्राहक वर्गातील लोकप्रियता
  • उत्तम सप्लाय चेन
  • उत्तम ऑपरेशन क्वालिटी आणि लोक केंद्रित परिचलन आणि अद्ययावत तंत्रज्ञान 
  • अनुभवी मॅनेजमेंट

ही कंपनीची बलस्थाने आहेत.

बर्गर किंग कंपनी २२ प्रकारचे विविध व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ रेस्टॉरंट्समधून विकते. कंपनीकडे सध्या व्हेज पदार्थांची विविधता आहे. तसेच कंपनी आपला विस्तार करताना रिजनल पदार्थ रेस्टॉरंट्स मध्ये उपलब्ध करून देत आहे.   बर्गर किंग कंपनी १५-३४ वयोगटातील ग्राहक वर्ग खेचत आहे. कंपनी लागणार कच्चा माल लोकल सप्लायर्स कडून घेत असून सप्लाय चेन वर कंट्रोल असून त्याचा उपयोग कंपनीस किमती कमी ठेवण्यास होत आहे.

  • रेस्टॉरंट्स उद्योग विस्ताराची गती कायम ठेवणे.
  • ब्रॅंड अवेरनेस आणि ब्रॅंड लॉयल्टी वाढवणे
  • तंत्रज्ञानाच उपयोग उद्योगात वाढवून व्यवसाय विस्तार करणे

ही या कंपनीच्या  भारतात व्यवसाय विस्तार रणनीती आहे.

बर्गर किंग कडे भारतात ५६३६ कर्मचारी असून ५४७९ कर्मचारी रेस्टॉरंट्समध्ये कार्यरत आहेत. तसेच ८८९ रेस्टॉरंट्स मॅनेजर्स आहेत तर १५७ कर्मचारी ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मध्ये काम करत आहेत.

प्रमोटर्स

प्रोमोटर्स – QSR Asia Pte Ltd. ही कंपनी बर्गर किंग इंडिया लिमिटेडची प्रोमोटर असून  त्यांच्याकडे २८,९३,११,११० शेअर्स म्हणजेच ९९.३९%  हिस्सा आहे.

कंपनी फायनान्शियल्स

 मार्च २०१७ मार्च २०१८ मार्च २०१९ मार्च २०२०
मालमत्ता६९८४.६३७३०३.५५९२०४.७२११९७७.०७
आय२३४१.३३३८८७.३७६४४१.३०८४६८.२९
खर्च३०५९.७९४७०९.६९६८२४.०९९१९०.५४
नफा/तोटा७१८.४६८२२.३२३८२.७९७६५.७०

IPO ऑफर

आयपीओचा उद्देश

बर्गर किंग च्या आयपीओ मध्ये कंपनी ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू आणत आहे. कंपनीचे प्रोमोटर्स ऑफर फॉर सेल द्वारे स्वत:चा हिस्सा विकणार आहेत. तर फ्रेश इश्यू आणून कंपनी भांडवल उभे करत आहे. कंपनी या भांडवलाचा वापर कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी तसेच स्व:मालकीचे नवीन  रेस्टॉरंट्स स्थापन करण्यासाठी करणार आहे

OFS – प्रमोटर्स ofs द्वारे ३६० कोटी रुपयांचे ६,००,००,००० शेअर्स विकून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे

फ्रेश इश्यू –  या आयपीओ मध्ये फ्रेश इश्यू द्वारा  ७,५०,००,००० शेअर्स गुंतवणूकदारासाठी उपलब्ध असणार आहेत. हा फ्रेश इश्यू ४५० कोटी रुपयांचा असेल.

आयपीओ डिटेल्स

आयपीओ तारीख२ डिसेंबर २०२०-   ४ डिसेंबर २०२०
आयपीओ प्रकारबूक बिल्ट इश्यू
साईज८१० कोटी
फेस व्हॅल्यू₹ १०
प्राइज बॅंड₹५९ –  ₹६०
लॉट२५०
लिस्टिंग एक्स्चेंजBSE-NSE

आयपीओ वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख२ डिसेंबर २०२०
आयपीओ बंद होण्याची तारीख ४  डिसेंबर २०२०
अलॉटमेंट तारीख९  डिसेंबर २०२०
रिफंड१० डिसेंबर २०२०
डिमॅट ट्रान्सफर तारीख११ डिसेंबर २०२०
लिस्टिंग तारीख १४ डिसेंबर २०२०

बूक रनिंग लीड मॅनेजर्स

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड
CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
JM फायनान्शियल लिमिटेड

रजिस्ट्रार

लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *