WWDC २०२०

येत्या २२ तारखे पासून ॲपलची वर्ल्डवाईड  डेव्हलपर कॉन्फरन्स सुरू होत आहे. ॲपलची ही कॉन्फरन्स हा एक असा बहूप्रतीक्षित इव्हेंट असतो की जिथे डेव्हलपर्स ॲपल इंजिनियर्सना भेटू शकतात आणि विविध सेशन्समध्ये सहभागी होऊ शकतात.

ॲपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स WWDC कॅलिफोर्नियातील सॅन जोसे येथे दरवर्षी आयोजित केली जाणारी परिषद आहे. ॲपल सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी त्याचे नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी या इव्हेंटचा वापर करते. या दरम्यान डेव्हलपर्स ॲपल इंजिनियर्ससह हँडस्-ऑन लॅबमध्ये सहभागी होऊ शकतात आणि विविध विषयांच्या विस्तृत सखोल सेशन्समध्ये उपस्थित राहू शकतात. या कॉन्फरन्समध्ये  डेव्हलपर्सना सादर होणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स्  डेव्हलपर टूल्स तर  पाहायला मिळतातच तसेच त्यांना ॲपल इंजिनियर्स सोबत संवाद साधता येतो.

ॲपलची ही ३१वी  कॉन्फरन्स असून प्रथमच ही ऑनलाइन होत आहे. ही कॉन्फरन्स २२ जून ते २६ जून अशी पाच दिवस असणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे या वर्षी कंपनीने हा इव्हेंट ऑनलाइन ठेवला आहे. ही कॉन्फरन्स २२ जून रोजी सुरू होत असून  ही सर्वासाठी मोफत असणार आहे.  WWDC नेहमी मॅकेनेरी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होते आणि या कॉन्फरन्सला उपस्थित राहण्यासाठी साधारणपणे १५९९ डॉलरचे शुल्क द्यावे लागते.

या वर्षी WWDC २०२० मध्ये ॲपल सॉफ्टवेअर्स सोबत काही नवीन हार्डवेअर सादर करेल अशी अपेक्षा आहे. या इव्हेंट मध्ये ॲपलARM बेस्ड मॅक बद्दल काही माहिती सादर करेल अशी अपेक्षा आहे. ॲपलने मागेच सूचित केले होते की ते ARM आर्किटेक्चरवर आधारित चिप्सवर चालणाऱ्या मॅकवर काम करत आहेत. पण ही ARM बेस्ड मॅक २०२१ पूर्वी बाजारात येतील अशी शक्यता नाही. ॲपलचे नवीन iMac, तसेच iMac Pro या इव्हेंट मध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. या मध्ये मॅक प्रो, मॅकबूक प्रो यासारख्या कम्प्युटर्स मध्ये असणारी T2 सेक्युरिटी चिप असेल तसेच या नव्या iMac मध्ये SSD च वापर अपेक्षित असून जो मेकॅनिकल हार्डड्राइव्ह तसेच फ्यूजन हार्डड्राइव्हला  रीप्लेस करेल. नव्या iMac तसेच iMac Pro मध्ये बारीक बेजेल्स, तसेच प्रो डिस्प्ले xdr सारख्या स्क्रीनचा वापर पाहायला मिळू शकतो. या दोन्ही कम्प्युटर्स मध्ये नवीन AMD चे NAVI  GPU तसेच इंटेल द्वारा निर्मित कॉमेट लेक CPU पाहायला मिळतील अशी आशा आहे. या इव्हेंट मध्ये ॲपल AR Headset (ऑगमेंटेड रियालिटी हेडसेट) सादर करेल अशी अपेक्षा आहे.

तसेच या इव्हेंट मध्ये ॲपल विविध सॉफ्टवेअर्स सादर करेल ही अपेक्षा आहे. यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम्सच्या नव्या आवृत्ती, काही नवे ॲप्स सादर होतील. यामध्ये नवीन iOS14, ipadOS14, tvOS14, watchOS7, तसेच ॲपलची लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम macOS10.16 ही सादर होईल अशी अपेक्षा आहे.

iOS14 मध्ये सुधारील होम स्क्रीन्स, नवीन मेसेजिंग ॲप, ॲपलचे नवीन फिटनेस ॲप, AR ॲप्स, आणि थर्ड पार्टी वॉलपेपर पॅक्स पाहायला मिळू शकतात. तसेच iPadOS14 सोबत ॲपल पेन्सिल मध्येही काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील. तसेच नवीन watchOS7 मध्ये ब्लड ऑक्सीजन ट्रॅकिंगचे नवीन फीचर पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.   

भारतीय वेळेनुसार WWDC 2020 २२ जून रोजी रात्री १०.३० वाजता चालू होईल. पहिल्या सेशनमध्ये ॲपलचे अधिकारी या वेळी नवीन सॉफ्टवेअर्स, डेव्हलपर टूल्स सादर करतील. हे पहिले सेशन https://www.apple.com/ पाहता येईल. नंतरच्या सेशनमध्ये ॲपलचे इंजिनीयरिंग हेडस् नवीन ऑपरेटिंग सिस्टम, त्यातील नवीन फीचर्स, नवीन प्रॉडक्टस् सादर करतील. दुपारचे सेशन पाहण्यासाठी ॲपल डेव्हलपर ॲप अथवा ॲपल डेव्हलपर वेबसाइट https://developer.apple.com/ येथे पाहता येईल.  

२३-२६ जून ही तीन दिवस पहिल्यांदा इंजिनारिंग सेशन असणार आहे ज्यात आणि अभियांत्रिकी आणि ॲपल कोडवर चर्चा होईल. हे सेशन्स ॲपल डेव्हलपर ॲप वर आणि ॲपल डेव्हलपर वेबसाइटवर पाहता येईल.या चार दिवशी दुपारचे सेशन हे डेव्हलपर लॅब्स् साठी  असणार आहे. यात डेव्हलपर्स ॲपल इंजिनीयर्स सोबत सखोल चर्चा, प्रश्नोत्तरे करू शकतील. तसेच डेव्हलपर्सना नवीन फीचर्स आणि त्यांचा  प्रत्यक्ष वापर या संबंधी माहिती घेत येईल. हे सेशन खुले नसून ॲपल डेव्हलपर अकाऊंट असणाऱ्यानाच यात सहभागी होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *