apple-img

ॲपल कडून भारतात ऑनलाइन विक्रीस सुरुवात

येत्या २३ तारखे पासून ॲपल(Apple) भारतात ऑनलाइन विक्री सुरू करत आहे. कंपनीने १७ तारखेस प्रसिद्ध केलेल्या पत्रात घोषणा केली आहे. प्रथमच कंपनी भारतात स्वत:चे ऑनलाइन स्टोअर चालू करत आहे.

सुविधा

ॲपल या ऑनलाइन स्टोअर द्वारे आपल्या ग्राहकांना विविध नवीन सेवा उपलब्ध करून देणार आहे. या ऑनलाइन स्टोअर मध्ये ग्राहकास खरेदी करण्यास सहाय्य करण्यासाठी कंपनीने ॲपल स्पेशालिस्ट उपलब्ध केले आहेत, जे ग्राहकास खरेदी करताना त्यांच्या साठी गरजेनुसार योग्य उत्पादन सुचवू शकतील.

तसेच, या आधी भारतात कस्टमाईज केलेले ॲपल डिव्हाईस मिळणे जरा कठीण होते. आता  कंपनीने  ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उदा. जर ग्राहक मॅक खरेदी करत असेल तर त्याला त्याच्या गरजेनुसार प्रोसेसर, अधिक रॅम, आणि हार्ड ड्राइव्ह असलेला कम्प्युटर कॉन्फिगर करून घेत येईल. तसेच कंपनीने प्रथमच भारतात एन्ग्रेव्हिंग ची सुविधाही उपलब्ध केली असून या मध्ये , बंगाली, गुजराथी,मराठी,तमिळ, तेलुगु या भाषेतील मजकूर अथवा इमोजी ग्राहकास खरेदी केलेल्या उत्पादनावर एन्ग्रेव्ह करता येईल

ॲपल ऑनलाइन स्टोअर मार्फत कंपनीने एक्स्चेंज, ॲपल केअर प्लस , ऑनलाइन चॅट सपोर्ट, अशा सुविधा कंपनी देऊ करणार आहे.

या ऑनलाइन स्टोअर सोबतच ॲपल भारतात एज्युकेशनल स्टोअर चालू करत आहे. या स्टोअर मार्फत शिक्षक आणि विद्यार्थ्यंसाठी आयपॅड (ipad), मॅक, आयफोन अशा डिव्हायसेसवर सूट दिली जाईल. तसेच एक्स्टेंडेड वॉरंटी, ॲपल केअर अशा सर्व्हिसेस दिल्या जातील.  

पेमेंट आणि शिपिंग

या ऑनलाइन स्टोअर वरून खरेदी केल्यानंतर पेमेंट साठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ईएमआय, आणि upi असे भारतात उपलब्ध असणारे सर्व पेमेंट ऑप्शन्स ॲपलने उपलब्ध करून दिले आहेत. परंतू ,सुरुवातीस कॅश ऑन डिलिव्हरी हा पेमेंट ऑप्शन उपलब्ध नसणार आहे. खरेदी केलेल्या उत्पादनाच्या डिलिव्हरी कंपनी ब्लु डार्ट मार्फत करणार असून; खरेदी केल्यानंतर ऑर्डर २४ ते ७२ तासात ते ग्राहकाकडे पोहोचेल. ही कॉनटॅक्टलेस डिलिव्हरी असून त्यासाठी सहीची गरज लागणार नाही.   

ॲपलसाठी  भारत ही एक मोठी बाजारपेठ असून बाजारातील कंपनीचा हिस्सा हळू-हळू वाढत आहे. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, या सारख्या ॲपलसाठी  मॅन्यूफॅक्च्युरिंग करणाऱ्या कंपन्यानी त्यांचे चीन मधील प्रॉडक्शन भारतात हलवले आहे. लोकप्रिय फोन असलेल्या आयफोन चे नवीन मॉडेल आयफोन १२ येत्या ऑक्टोबर महिन्यात बाजरात सादर होणार आहे. या आयफोन १२ चे उत्पादन कंपनी भारतात करत आहे. तसेच आयफोन XR, आयफोन ११ यांचे उत्पादनही भारतात चालू आहे. भविष्यात ॲपल मुंबई आणि बेगळुरू इथे स्वत:चे रिटेल स्टोअर चालू करायची शक्यता आहे.  

One thought on “ॲपल कडून भारतात ऑनलाइन विक्रीस सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *