anupam rasayan ipo

11. Anupam Rasayan IPO Details : अनुपम रसायन आयपीओ.

Anupam Rasayan IPO

अनुपम रसायन इंडिया लिमिटेड

हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड या केमिकल सेक्टरच्या कंपनीचा आयपीओ नुकताच येउन गेला. अशाच एका कंपनीचा आयपीओ (IPO) येत आहे. अनुपम रसायन इंडिया लिमिटेड (Anupam Rasayan India Limited) या कंपनीचा आयपीओ मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येत आहे.

कंपनीचा इतिहास

अनुपम रसायन इंडिया हि एक केमिकल सेक्टरची कंपनी आहे. कंपनीची स्थापना गुजरात मध्ये सुरत येथे १ एप्रिल १९८४ रोजी अनुपम रसायन या नावाने भागिदारी कंपनी (पार्टनरशिप फर्म) या स्वरुपात झाली. पुढे ३० सप्टेंबर २००३ रोजी या पार्टनरशिप फर्मचे कंपनीचे जॉइंट स्टॉक कंपनीत रुपांरण करण्यात येऊन पब्लिक लिमिटेड कंपनीच्या रुपात रजिस्ट्रेशन करण्यात आले. मूळत: हंसा देसाई, सोनिया देसाई, पुर्णिमा देसाई आणि अश्विन देसाई यांनी अनुपम रसायन भागिदारी कंपनी चालू केली होती.

कंपनीचा व्यवसाय

वर उल्लेख केल्या प्रमाणे अनुपम रसायन इंडिया लिमिटेड हि एक केमिकल सेक्टरची कंपनी आहे. अनुपम रसायन हि भारतातील (स्पेशालिटी केमिकल्स)रसायन निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी संश्लेषण,आधुनिक उत्पादन प्रक्रिया, यांचा वापर करून भारतातील आणि परदेशी ग्राहकांसाठी केमिकल प्रॉडक्टचे उत्पादन करत आहे.

कंपनी सध्या दोन बिझनेस व्हर्टीकल मध्ये काम करत आहे. लाईफ सायन्स केमिकल्स, या बिझनेस व्हर्टीकल खाली कंपनी ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स आणि पर्सनल केअर यासारख्या उत्पादनाशी निगडीत स्पेशालिटी केमिकल्सचे निर्माण करते. तर दुसऱ्या बिझनेस व्हर्टीकल खाली पिगमेंट्स, डाईज, पॉलिमर ॲडिटीव्ह यांचे उत्पादन करत आहे.

कंपनीने गेल्या ९ महिन्यात ५३ स्थानिक आणि परदेशी ग्राहकांसाठी उत्पादन केले आहे; यामध्ये १७ बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. कंपनी अनेक वर्षापासून सिंजेंटा, UPL या सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोबत व्यवसाय करत आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स जपान, अमेरिका, युरोप या देशात निर्यात केले जातात. भारत सरकार द्वारा कंपनीस थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस दर्जा देण्यात आला आहे.

अनुपम रसायन इंडिया लिमिटेडच्या भारतात गुजरात मध्ये ६ मॅन्युफॅक्च्युरिंग साईट्स आहेत. यापैकी चार फॅसिलिटीज सचिन, सुरत येथे तर दोन झगडिया, भरुच येथे आहेत. कंपनीच्या मॅन्युफॅक्च्युरिंग फॅसिलिटीजची एकून क्षमता २३४३८ मे.टन इतकीआहे.

कंपनी ठळक वैशिष्टे

विविध ग्राहकांशी असलेले उत्तम संबंध

रिसर्च अँड डेव्हेलपमेंट, आधुनिक केमिस्ट्री यांच्यावर भर

वैविध्यतापुर्ण (डायव्हर्सिफाइड ) प्रॉडक्ट पोर्टफोलिओ.

ॲटोमेटेड मॅन्युफॅक्च्युरिंग फॅसिलिटीज

उत्तम आर्थिक स्थिती

अनुभवी व्यवस्थापन.

ही अनुपम रसायन इंडिया लिमिटेडची ठळक वैशिष्टे आहेत.

फायनान्शिअल्स


३० डिसेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स१९१९२.१५१६६४०.६८१३२२५.०३१००१२.०९
रेव्हेन्यु५६३१.६१५३९३.८७५२०९.६१३४९१.८२
प्रॉफिट (PAT)४८०.९४५२९.७५५०२.०९४०३.४१

(सर्व आकडे दशलक्ष रुपयात)

IPO

७६०० दशलक्ष रुपयांचा अनुपम रसायन इंडिया लिमिटेडचा हा आयपीओ (IPO) हा एक बुक बिल्ट इश्यू आहे. कंपनीचा आयपीओ १२ मार्च रोजी खुला होत असून १६ मार्च पर्यंत हा इश्यू खुला असणार आहे.

आयपीओचा उद्देश

कंपनीवरिल कर्ज कमि करणे

इतर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देश पुर्ण करणे

ही या आयपीओ आणण्या मागिल प्रमुख कारणे आहेत.

आयपीओ डिटेल्स

कंपनी – अनुपम रसायन इंडिया लिमिटेड (Anupam Rasayan India Limited)

सेक्टर – केमिकल

इंडस्ट्री – केमिकल

प्रमोटर्स – आनंद देसाई, डॉ. किरण पटेल, मोना देसाई, किरण पल्लवी इन्व्हेस्टमेंट्स एलएलसी, रेहांश इंडस्ट्रीअल अँड रेजिन्स केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड.

तपशील

आयपीओ खुला होण्याची तारीख१२ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१६ मार्च २०२१
साईज७६०० दशलक्ष
लॉट साईज२६७
प्राईज बँड₹५५३ – ₹५५५
फेस व्हॅल्यू₹ १०
एक्सचेंजNSE – BSE

महत्वाच्या तारखा

आयपीओ खुला होण्याची तारीख१२ मार्च २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१६ मार्च २०२१
बेसिस अलॉटमेंट१९ मार्च २०२१
रिफंड२२ मार्च २०२१
डिमॅट अकाऊंट मध्ये शेअर्स क्रेडीट२३ मार्च २०२१
लिस्टींग२४ मार्च २०२१

बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM’s)

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड.
अँबिट प्रायव्हेट लिमिटेड
JM फायनान्शिअल लिमिटेड.
IIFL सिक्युरिटिज लिमिटेड.

रजिस्ट्रार

के-फिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीचा पत्ता

अनुपम रसायन इंडिया लिमिटेड. (Anupam Rasayan India Limited)

८११०, गुजरात इंडस्ट्रिअल डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशन (GIDC) इंडस्ट्रिअल इस्टेट.

सचिन, सुरत, गुजरात

पिन- ३९४२३०

इमेल : investors@anupamrasayan.com

वेबसाईट : http://www.anupamrasayan.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *