अँथनी वेस्ट आयपीओ (Anthony West IPO)
अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड आयपीओ
जानेवारी २००१ रोजी चालू झालेली अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड (Antony Waste Handling Cell Limited) कंपनी आयपीओ (IPO) आणत आहे. वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणारी ही कंपनी असून कंपनीचा आयपीओ येत्या २१ तारखेस खुला होत असून २३ पर्यंत खुला असणार आहे.
कंपनीचा इतिहास
कंपनीची स्थापना १७ जानेवारी २००१ रोजी अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ठाणे येथे झाली होती. १२ डिसेंबर २०१८ रोजी कंपनीचे रूपांतरण पब्लिक लिमिटेड कंपनी मध्ये करण्यात आले आणि नाव अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड असे करण्यात आले.
व्यवसाय
अँथनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड कंपनी कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात व्यवसाय करत आहे. म्युनिसिपल वेस्ट मॅनेजमेंट इंडस्ट्री मधील ही एक मोठी कंपनी आहे. कंपनी भारतातील बऱ्याच महानगरपालिकाना म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट(MSW) सर्व्हिस पुरवते. ज्या मध्ये कचरा गोळा करणे, त्याचे वहन आणि त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे या सुविधाचा समावेश होतो. या शिवाय कंपनी कचऱ्या पासून ऊर्जा उत्पादन ही करत आहे.
ग्राहक
कंपनी सध्या १८ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट(MSW) प्रोजेक्ट्स वर काम करत असून ज्या मध्ये नवी मुंबई , ठाणे, मंगलोर, गुडगाव या सारख्या मोठ्या प्रोजेक्टसचा समावेश आहे. कंपनीच्या ८ उपकंपन्या सबसायडरीज असून ज्या मार्फत कंपनी सुविधा पुरवते.
एंड टू एंड सोल्यूशन्स ची उपलब्धता
उत्तम रेकॉर्ड
वैविध्यतापूर्ण पोर्टफोलिओ
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर
अनुभवी व्यवस्थापन
ही या कंपनीची बलस्थाने आहेत
प्रमोटर
होजे जेकब कल्लारकल, शिजु जेकब कल्लारकल आणि शिजू अँथनी कल्लारक्कल हे कंपनीचे प्रोमोटर आहेत.
कंपनीचा आर्थिक ताळेबंद
सप्टेंबर २०२० | मार्च २०२० | मार्च २०१९ | मार्च २०१८ | |
ॲसेट्स | ७०७५.६७ | ६७२१.०३ | ५१२६.३८ | ४२८०.७० |
एकूण आय | २१५१.०१ | ४६४६.११ | २९८५.१८ | २९०७.७८ |
एकूण खर्च | १८५१.९७ | ३७९४.३८ | २५०८.३८ | २४१९.९१ |
कर वजा जाता फायदा | २९०.५० | ६२०.७६ | ३४६.८२ | ३९८.८४ |
(आकडे दशलक्ष रुपयात)
आयपीओ (IPO)माहिती
वर उल्लेख केल्या प्रमाणे कंपनीचा आयपीओ २ डिसेंबर २०२० रोजी खुला होणार आहे आणि २३ डिसेंबर २०२० पर्यंत खुला राहणार आहे.
आयपीओ (IPO) उद्देश
कंपनी या आयपीओ द्वारे खालील उद्दिष्ट्ये पूर्ण करणार आहे.
- पिंपरी चिंचवड मधील प्रोजेक्ट साठी भांडवल उभे करणे.
- कंपनी वरील कर्ज कमी करणे.
- इतर कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये पूर्ण करणे.
कंपनी ४० कोटी रुपये पिंपरी चिंचवड मधील प्रोजेक्ट साठी; तर ३८ कोटी रुपये कंपनी वरील कर्ज कमी करण्यासाठी वापरणार आहे.
ऑफर
या ३०० कोटीच्या आयपीओ मध्ये 85 कोटी रुपयाचा फ्रेश इश्यू ;तर २१५ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असणार आहे. फ्रेश इश्यू मार्फत कंपनी २६,९८,४१२ शेअर्स, तर ऑफर फॉर सेल द्वारे ६८,२४,९३३ शेअर्स विकणार आहे.
ऑफर फॉर सेल द्वारे खालील शेअर होल्डर्स आपले शेअर्स विकणार आहेत
लीड्स (मॉरिशिअस) लिमिटेड | १३,९०,३३३ |
टोनब्रिज (मॉरिशिअस) लिमिटेड | २०,८५,५१० |
केंब्रिज (मॉरिशिअस) लिमिटेड | ११,५८,६६७ |
गिल्डफोर्ड (मॉरिशिअस) लिमिटेड | २१,९०,४२६ |
आयपीओचा तपशील (IPO Details)
आयपीओ तारीख | २१ डिसेंबर २०२०- १२३ डिसेंबर २०२० |
आयपीओ प्रकार | बूक बिल्ट इश्यू |
साईज | ९५,२३,३४५ |
फेस व्हॅल्यू | ₹५ |
प्राइज बॅंड | ₹३१३ – ₹३१५ |
लॉट | ४७ |
लिस्टिंग एक्स्चेंज | BSE-NSE |
आयपीओ वेळापत्रक (IPO Timetable)
आयपीओ खुला होण्याची तारीख | २१ डिसेंबर २०२० |
आयपीओ बंद होण्याची तारीख | २३ डिसेंबर २०२० |
अलॉटमेंट तारीख | २९ डिसेंबर २०२० |
रिफंड | ३० डिसेंबर २०२० |
डिमॅट ट्रान्सफर तारीख | ३१ डिसेंबर २०२० |
लिस्टिंग तारीख | १ डिसेंबर २०२० |
लीड मॅनेजर्स
१ | इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड. |
२ | IIFL सेक्युरिटीज लिमिटेड |
रजिस्ट्रार
लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. |
कंपनीचा पत्ताआणि संपर्क
रजिस्टर्ड ऑफिस
१४०३,१४वा मजला, देव कॉर्पोरा बिल्डिंग
कॅडबरी कंपनी समोर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
ठाणे, महाराष्ट्र
४००६०१
कॉर्पोरेट ऑफिस
१४०२,१४०४ १४वा मजला,देव कॉर्पोरा बिल्डिंग
कॅडबरी कंपनी समोर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
ठाणे, महाराष्ट्र
४००६०१
Email: investor.relations@antonyasia.com;
Website: www.antony-waste.com