angel-broking-image

Angel Broking IPO (एंजल ब्रोकिंग आयपीओ )

१९९६  साली स्थापन झालेली भारतीय ब्रोकरेज फर्म एंजल ब्रोकिंग (Angel Broking) ही आयपीओ (IPO) आणत आहे. एसबीआय कार्ड, रोसारी बॉयोटेक, माइंड स्पेस बिजनेस पार्क्स, हॅपीएस्ट माइंडस, रूट मोबाईल, कॅम्स, चेमकॉन  नंतर येणारा  २०२० या वर्षातील ८वा आयपीओ आहे.

कंपनीने आपल्या आयपीओ ची प्राइज बॅन्ड ₹३०५ -₹३०६ इतका ठेवला आहे.

या आयपीओ द्वारे एंजेल ब्रोकिंग ₹६०० कोटी रुपये उभे करू पाहत असून यातील ₹३०० कोटी रुपये फ्रेश इश्यू द्वारे तर ₹३०० कोटी ऑफर फॉर सेल द्वारे उभा करणार आहे.

एंजल ब्रोकिंग ही भारतातील चौथ्या क्रमांकाची ब्रोकरेज हाऊस असून ही कंपनी ₹१३२५४ कोटीचे असेट्स मॅनेज करते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एडेलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एसबीआय कॅपिटल हे या आयपीओ (IPO) साठी  लीड  मॅनेजर म्हणून काम पाहणार असून लिंक इनटाइम इंडिया ही रजिस्ट्रार असणार आहे.

आयपीओ खुला होण्याची तारीख २२ सप्टेंबर २०२०  
आयपीओ बंद होण्याची तारीख २४  सप्टेंबर २०२०  
आयपीओ साईज ₹६०० कोटी
फेस व्हॅल्यू ₹१०
प्राइज बॅंड ₹३०५-₹३०६
लॉट  साईज ४९
मिनीमम ऑर्डर क्वांटिटी ४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *