होम फर्स्ट फायनान्स आयपीओ
होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड आयपीओ
ओळख
IRFC नंतर इंडिगो पेंट्स सोबत अजून एक कंपनी आयपीओ आणत आहे. होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येत आहे. २०२१ च्या जानेवारीतील हा तिसरा आयपीओ असणार आहे. कंपनीने २०१९ मध्येच सेबी कडे ड्राफ्ट सादर केला होता. कंपनीचा आयपीओ २१ जानेवारीस खुला होणार आहे.होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ही कंपनी फायनान्स सेक्टरशी निगडीत कंपनी असून कंपनी हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री मध्ये व्यवसाय करत आहे.
इतिहास
कंपनीची स्थापना बेंगलोर; कर्नाटक येथे ३ फेब्रूवारी २०१० रोजी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने झाली होती. १४ मार्च २०१८ रोजी कंपनीचे रूपांतरण पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले आणि कंपनीचे नाव होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. कंपनीची स्थापना जयतीर्थ राव ,पी.एस.जयकुमार,आणि मनोज विश्वनाथन यांनी २०१० मध्ये केली होती.
कंपनीचा व्यवसाय
होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ही एक अफॉर्डेबल होम फायनान्स कंपनी आहे. कंपनी प्रथमच घर खरेदी करणाऱ्या मध्यम वर्गास फायनान्स करण्याचे काम करते. अर्थात कंपनी घर खरेदी अथवा घर बांधणी साठी पतपुरवठा करते. कंपनी पगारदार तसेच व्यावसायिक व्यक्तीस कर्ज वाटप करत असून याच सोबत कंपनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, डेव्हलपर फायनान्स लोन्स, कमर्शियल प्रॉपर्टी लोन्स या स्वरूपांचे कर्ज वाटप करते. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कंपनीकडे ४४७९६ लोन अकाऊंट्स आहेत.
कंपनी एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फायनान्स कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने आपल्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. लोन ॲप्लीकेशन प्रोसेसिंग, कस्टमर एक्सपिरीयन्स मॅनेजमेंट,आणि रिस्क मॅनेजमेंट या सारख्या नियमित व्यावसायिक ॲक्टीव्हिटीज साठी कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. कंपनीने क्लाऊड बेस्ड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम तयार केली असून कंपनी याचा वापर ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी करत आहे. या सोबतच कंपनीने मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीन लर्निंग कस्टमर स्कोरिंग मॉडेल्स तयार केलेले असून याचा वापर कंपनी ग्राहकांचे अचूक क्रेडिट इव्हॅल्युएशन करण्यासाठी साठी करत आहे.
कंपनी विविध खाजगी आणि सरकारी बँकाकडून, NHB यांच्याकडून दीर्घ मुदतीचे कर्ज उभे करते. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कंपनीने २६३६५.७८ दशलक्ष रुपये कर्जाऊ घेतले आहेत. कंपनीस CARE A+ क्रेडिट रेटिंग प्राप्त असून ICRA कडून A+ (स्टेबल) रेटिंग मिळालेले आहे.
३० सप्टेंबर २०२० पर्यंत कंपनीच्या ६० जिल्ह्यात ७० शाखा असून ज्या ११ राज्ये आणि १ केंद्र शासित प्रदेशात विखुरल्या आहेत. विशेषत: गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या ४ राज्यात कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केंद्रित आहे.
यासोबतच
- टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी
- व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञाच वापर
- कस्टमर सेंट्रिक बिझनेस मॉडेल
- विस्तृत ब्रांच नेटवर्क
- टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कलेक्शन सिस्टम
- अनुभवी व्यवस्थापन
ही या कंपनीची बलस्थाने आहेत.
या शिवाय
- तंत्रज्ञानाचा वापर करून ऑपरेशनल इफीशिअन्सी वाढवणे
- ब्रांच नेटवर्क वाढवणे.
- ब्रांचेसची प्रॉडक्टीव्हिटी वाढवणे.
- बॉरोविंग सोर्सेस डायव्हर्सिफाय करून बॉरोविंग कॉस्ट कमी करणे.
- रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्कचा विकास करणे
या कंपनीच्या व्यावसाईक रणनीती आहेत.
प्रमोटर्स
ट्रू नॉर्थ फंड V एलएलपी आणि एथर (मॉरिशिअस) लिमिटेड हे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडचे प्रमोटर्स आहेत.
फायनान्शियल्स
३०सप्टेंबर २०२० | ३०सप्टेंबर २०२० | ३१ मार्च २०२० | ३१ मार्च २०१९ | ३१ मार्च २०१८ | |
ॲसेट्स | ३७२२१.९६ | ३२४७६.५४ | ३४७९६.११ | २४८२०.०५ | १३६४९.४२ |
लायबलिटीज | २७३४०.०६ | २३५८३.५१ | २५४५९.७५ | १९५८८.६५ | १०३९७.२७ |
इन्कम (आय) | २४३१.९३ | १९३७.७३ | ४१९६.५७ | २७०९.२१ | १३४२.३७ |
एक्सपेन्स (खर्च) | १७२८.३५ | १४३४.८८ | ३१२३.७४ | २०५७.२६ | १०९९.६७ |
प्रॉफिट (टॅक्स वजा जाता ) | ५२९.५३ | ३६७.४१ | ७९२.४९ | ४५२.०४ | १५९.९६ |
(आकडे दशलक्ष रुपयात)
होम फर्स्ट फायनान्स IPO
ऑफर
कंपनीचा आयपीओ २१ जानेवारी २०२१ रोजी खुला होत असून २५ जानेवारी २०२१ पर्यंत खुला असणार आहे. कंपनीचा हा आयपीओ बूक बिल्ट इश्यू असून या मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. कंपनीचा आयपीओ एकूण ११५३७.१९ दशलक्ष रुपयांचा असून यात २६५० दशलक्ष रुपयांचा फ्रेश इश्यू तर ८८८७.३७ दशलक्ष रुपयांचा ऑफर फॉर सेल असणार आहे.
IPO उद्देश
- व्यवसाय वृद्धी साठी भांडवल उभे करणे
- स्टॉक मार्केट वर लिस्टिंग करून त्याद्वारे प्राप्त होणारे फायदे मिळवणे.
तपशील
आयपीओ तारीख | २१जानेवारी २०२- १ २५ जानेवारी २०२१ |
आयपीओ प्रकार | बूक बिल्ट इश्यू |
साईज | ११५३.७ कोटी |
फेस व्हॅल्यू | ₹२ |
प्राइज बॅंड | ₹५१७ – ₹५१८ |
लॉट | २८ |
लिस्टिंग एक्स्चेंज | BSE-NSE |
वेळापत्रक (अंदाजे )
आयपीओ खुला होण्याची तारीख | २१ जानेवारी २०२१ |
आयपीओ बंद होण्याची तारीख | २५ जानेवारी २०२१ |
अलॉटमेंट तारीख | २९ जानेवारी २०२१ |
रिफंड | ०१ जानेवारी २०२१ |
डिमॅट ट्रान्सफर तारीख | ०२ फेब्रुवारी २०२१ |
लिस्टिंग तारीख | ०३ फेब्रुवारी २०२१ |
बूक रनिंग लीड मॅनेजर्स
१ | ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड. |
२ | क्रेडिट स्युइस सेक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड |
३ | आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड. |
४ | कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड. |
रजिस्ट्रार
के-फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड. |
कंपनीचा पत्ता
होम फर्स्ट
५११ ॲक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रस्ता, अंधेरी पूर्व,
मुंबई, महाराष्ट्र.
४०० ०५९
वेबसाईट -: https://homefirstindia.com
ईमेल -: carporate@homefirstindia.com