स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड आयपीओ (Stove Kraft Limited IPO)
स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड (Stove Kraft Limited) ही कंपनी आपला आयपीओ (IPO) आणत आहे. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सेबी कडे २०१८ आणि २०२० मध्ये मध्ये सादर केले होते. कंपनीचा आयपीओ येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी खुला होता असून २७ जानेवारी २०२१ पर्यन्त खुला असणार आहे.
कंपनीची ओळख आणि इतिहास
कंपनीची स्थापना २८ जून १९९९ रोजी स्टोव्हक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बेंगलोर कर्नाटक इथे करण्यात आली होती. २८ मे २०१८ रोजी EGM मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार १३ ऑगस्ट २०१८ रोजी कंपनीचे रुपांतरण स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. राजेंद्र गांधी आणि सुनीता राजेंद्र गांधी ही कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
कंपनीचा व्यवसाय
स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड (Stove Kraft Limited ) ही भारतातील मोठ्या किचन अप्लायन्सेस सप्लायर्स पैकी एक कंपनी आहे. कंज्यूमर ड्यूरेबल्स सेक्टरची ही कंपनी डोमेस्टीक अप्लायन्सेस इंडस्ट्री मध्ये व्यवसाय करते. कंपनीचे पिजन (Pigeon) आणि गिलमा (Gilma) असे दोन नावाजलेले ब्रॅंडस असून कंपनी या ब्रॅंड नेम खाली किचन अप्लायन्सेस ची निर्मिती करते. कंपनी पिजन या ब्रॅंड नेम खाली अफॉर्डेबल किचन अप्लायन्सेस बनवते ज्यामध्ये कूकवेअर, कूकिंग अप्लायन्सेस, लाईटिंग सोल्यूशन्स चे उत्पादन आणि विक्री करते. तर चिमणी, कूकटॉप, हॉब अशा सेमी प्रीमियम प्रॉडक्ट्स ची निर्मिती गिलमा या ब्रॅंडनेम खाली करते.
यासोबतच कंपनी स्टॅनली ब्लॅक अँड डेकर (Stanley Black & Decker) या कंपनी कडून लायसन्स तत्वावर ब्लॅक अँड डेकर या ब्रॅंड खाली प्रीमियम सेगमेन्ट मध्ये ज्यूसर्स, ब्लेंडर्स, ब्रेकफास्ट अप्लायन्सेस यांची विक्री करते तसेच विक्री पश्चात सेवा पुरवते. कंपनी भारतात ब्लॅक अँड डेकर उत्पादने मॅन्युफॅक्च्यर करणार आहे.


स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड कंपनीच्या बेंगलोर कर्नाटक आणि बद्दी हिमाचल प्रदेश येथे मॅन्युफॅक्च्यरिंग फॅसिलिटीज आहेत . कंपनीची बेंगलोर फॅसिलिटी ४५ एकर वर पसरलेली असून येथे प्रेशर कुकर, नॉन-स्टीक कूकवेअर, एलपीजी स्टोव्ह, मिक्सर- ग्राइंडर्स, एलईडी बल्ब, इंडक्शन कूकटॉप, यांचे उत्पादन होते. तर बद्दी हिमाचल प्रदेश येथील फॅसिलिटी मध्ये एलपीजी स्टोव्ह आणि आतल्या झाकणाचे कूकर्स (Inner lid Cookers ) यांचे उत्पादन होते.
कंपनीचे पिजन, गिलमा आणि ब्लॅक अँड डेकर या ब्रॅंडस साठी स्वतंत्र डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. कंपनीचे २७ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशात एकूण ६५१ डिस्ट्रीब्युटर्स आहेत. कंपनीचे गिलमा ब्रॅंड प्रॉडक्ट्स त्यांच्या ६५ एक्सक्लुजिव्ह स्टोअर्स द्वारे विक्री केले जातात. यासोबतच स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड कंपनीचे प्रॉडक्ट्स अमेरिका, मेक्सिको या देशात पाठवले जातात.
वैशिष्ट्ये
- मोठी किचन अप्लायन्सेस कंपनी मोठा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ
- वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ
- स्ट्रॉंग ब्रॅंड
- मोठे आणि खोलवर पसरलेले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क.
- अत्याधुनिक मॅन्युफॅक्च्यरिंग फॅसिलिटीज
- स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी असलेली कंपनी
ही या स्टोव्ह क्राफ्ट कंपनीची वैशिष्ट्ये आहेत.
स्ट्रॅटेजी
कंपनीची मार्केट मधील संपर्क वाढवणे, प्रॉडक्ट पोर्टफॉलिओ वाढवणे, कंपनीच्या प्लॅंट मध्ये ऑटोमेशन वाढवणे. एलईडी बिझनेस वाढवणे. निर्यातीत वाढ या कंपनीच्या व्यावसायिक रणनीती आहेत.
स्टोव्ह क्राफ्ट फायनान्शियल्स
३० सप्टेंबर २०२० | ३१ मार्च २०२० | ३१ मार्च २०१९ | ३१ मार्च २०१८ | |
ॲसेट्स | ४९८४.९९ | ४७१२.९१ | ४२५७.२६ | ३९३६.२० |
लायबलिटीज | ५२८४.४२ | ५३१२.४५ | ४८९४.५५ | ५७३५.३० |
इन्कम (आय) | ३२९५.०९ | ६७२९.१४ | ६४२५.९८ | ५३४५.८५ |
एक्सपेन्स (खर्च) | ३००७.३३ | ६६९३.८० | ६४१३.७४ | ५४७१.४० |
प्रॉफिट (PAT) | २८७.७६ | ३१.७० | ७.३६ | १२०.१८ |
(सर्व आकडे दशलक्ष रुपयात)
IPO
स्टोव्हक्राफ्ट लिमिटेडचा आयपीओ (IPO) २५ जानेवारीस खुला होणार आहे. इश्यू ३ दिवस खुला असून २७ जानेवारीस बंद होणार आहे. सदर आयपीओ हा बूक बिल्ट इश्यू असून या मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांचा समावेश असणार आहे. या आयपीओ मध्ये ९५ कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे तर ८२,५०,००० शेअर्सचा ऑफर ऑफर सेल (OFS)असणार आहे.
ऑफर फॉर सेल (OFS)द्वारे खालील शेयर होल्डर्स शेअर्स विकणार आहेत.
SCI | ६००७९२० |
SCI-GIH | १४९२०८० |
राजेंद्र गांधी | ६९०७०० |
सुनीता राजेंद्र गांधी | ५९३०० |
आयपीओ उद्दिष्ट
कंपनीवरील कर्ज कमी करणे
इतर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देश पूर्ण करणे
ही या आयपीओ आणण्या मागचा उद्देश आहे.
स्टोव्ह क्राफ्ट आयपीओ तपशील
आयपीओ तारीख | २५ जानेवारी २०२- १ २७ जानेवारी २०२१ |
आयपीओ प्रकार | बूक बिल्ट इश्यू |
साईज | – |
फेस व्हॅल्यू | ₹१० |
प्राइज बॅंड | ₹३८४ – ₹ ३८५ |
लॉट | ३८ |
लिस्टिंग एक्स्चेंज | BSE-NSE |
आयपीओ वेळापत्रक (अंदाजे )
आयपीओ खुला होण्याची तारीख | २५ जानेवारी २०२१ |
आयपीओ बंद होण्याची तारीख | २७ जानेवारी २०२१ |
अलॉटमेंट तारीख | ०२ फेब्रुवारी २०२१ |
रिफंड | ०३ फेब्रुवारी २०२१ |
डिमॅट ट्रान्सफर तारीख | ०४ फेब्रुवारी २०२१ |
लिस्टिंग तारीख | ०५ फेब्रुवारी २०२१ |
बूक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM)
२ | एडेलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड |
३ | JM फायनान्शियल लिमिटेड. |
रजिस्ट्रार
१ | के-फिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड |
कंपनीचा पत्ता
स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड ( Stove Kraft Limited )
८१/१ मेडमारणाहळ्ळी विलेज,
हारोहळ्ळी होबळी कनकपुरा तालुका,
रमानगर डिस्ट्रिक्ट, कर्नाटक
५६२११२
Email- cs@stovekraft.com
वेबसाइट- www.stovekraft.com