स्टेट बँक ऑफ इंडिया SBI Life मधील हिस्सेदारी कमी करणार..

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपली उपकंपनी एसबीआय लाईफ मधील हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. काल दि. ११/०६/२०२० रोजी शेअर बाजाराला पाठविलेल्या पत्रात बँकेने ही माहिती कळविली आहे.
काल दि. ११/०६/२०२० रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बँक OFS द्वारे एसबीआय लाईफ मधील २.१% हिस्सा विकणार आहे. सेबीच्या नियमानुसार न्यूनतम सार्वजनिक भागीदारी ही २५ % ठेवणे बंधनकारक आहे. या कारणास्तव एसबीआय लाईफ मधील आपली हिस्सेदारी कमी करण्याकरीता एसबीआय सुमारे २,१०,००,००० समभाग विकणार आहे. तसेच संचालक मंडळाने १.५ अब्ज डॉलरचे भांडवल उभे करण्यास मान्यता दिली आहे. हे भांडवल बॉण्ड्स च्या विक्रीतून उभे कण्याचे ठविण्यात आले आहे.
एसबीआय ने आपली हिस्सेदारी विकण्यासाठी समभागाचे मूल्य ७२५ रुपये इतके ठरवले आहे. ही ऑफर फॉर सेल (OFS) आज १२.०६.२०२० रोजी खुला करण्यात आला आहे, आज पासून OFS (Non Retail Investors ) ठोक गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा १५.०६.२०२० रोजी खुला होणार आहे.
एसबीआय लाईफ ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि BNP पॅरिबास यांचा संयुक्त उपक्रम आहे. एसबीआय लाईफ मध्ये सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे 57.60% गुंतवणूक आहे.

One thought on “स्टेट बँक ऑफ इंडिया SBI Life मधील हिस्सेदारी कमी करणार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *