रिलायन्सचा रिटेल औषध वितरण उद्योगात प्रवेश

रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (Reliance Retail Ventures Limited) या आपल्या उपकंपनी  द्वारे व्हायटॅलीक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड (Vitalic Health Pvt. Ltd.) आणि तिच्या उपकंपनीत ६२० कोटी रुपयांमध्ये ६०% हिस्सा खरेदी केला आहे.

व्हायटॅलीक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या त्रीसारा  हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड (Tresara Health Private Limited), नेटमेडस् मार्केटप्लेस लिमिटेड (Netmeds Marketplace Limited) आणि धडा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्रायव्हेट लिमिटेड (Dadha Pharma Distribution Pvt Limited), या गुंतवणूकीमुळे रिटेल व्हेंचर लिमिटेड व्हायटॅलीक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमधील ६०% तर तिच्या वरील ३ उपकंपन्यांमध्ये १००% समभाग थेट गुंतवणूकी द्वारे खरेदी करत आहे.

रिलायन्स २०२४ पर्यंत व्हायटॅलीक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ८०% हिस्सा खरेदी करणार आहे. तसेच भविष्यात रिटेल व्हेंचर लिमिटेड गुंतवणुकी द्वारे १००% हिस्सा ताब्यात घेऊ शकते.

व्हायटॅलीक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही २०१५ साली चालू  झालेली कंपनी असून ही अन् तिच्या उपकंपन्या औषध वितरण आणि विक्री  उद्योगात काम करत असून कंपनीचा नेटमेडस् हा लोकप्रिय ऑनलाइन औषध विक्रीचा प्लॅटफॉर्म आहे.

या गुंतवणूकीद्वारे रिलायन्स किरकोळ औषध विक्री व्यवसायात प्रवेश करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *