ब्रुकफिल्ड

५. ब्रुकफिल्ड REIT आयपीओ : (5. Brookfield REIT IPO)

ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट यांचा आयपीओ पुढील आठवड्यात येत आहे. ब्रुकफिल्डचा  आयपीओ फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेस खुला होत असून हा आयपीओ ५ तारखेपर्यंत खुला असणार आहे.  सदर आयपीओ साठी या ट्रस्टने सेबिकडे सप्टेंबर २०२० मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केले होते.

इतिहास

ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट अर्थात ब्रूकफिल्ड REIT ट्रस्ट ची स्थापना १७ जुलै २०२० रोजी मुंबई येथे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या स्वरूपात  ट्रस्टच्या मॅनेजर मार्फत करण्यात आली. ब्रूकफिल्ड REIT सेबी रजिस्टर्ड ट्रस्ट असून  १४ सप्टेंबर २०२० रोजी ब्रूकफिल्ड REIT ला सेबी कडून मान्यता प्राप्त झाली.

ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंटशी संलग्न असणारी BSREP V ही कंपनी ब्रूकफिल्ड REIT ची स्पॉन्सर असून ब्रूकप्रॉप मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ट्रस्टची मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. सोबत ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी या REIT ची ट्रस्टी म्हणून काम पाहत आहे.

व्यवसाय

ब्रुकफिल्ड REIT ही भारतातील एकमेव इंस्टिट्यूट द्वारा चालविण्यात येणारी (institutionally managed) व्यावसायिक रिअल इस्टेट कंपनी आहे. ब्रुकफिल्ड REIT कडे  भारतातील मोठ्या शहरात ऑफिस कॅम्पस आहेत. ब्रुकफिल्ड या प्रॉपर्टीज मोठमोठ्या कंपन्याना लीजवर देते आणि त्याबदल्यात भाडे वसूल करते.   ब्रुकफिल्डच्या पोर्टफोलिओ मध्ये  सध्या ४ मोठे कॅम्पस फॉरमॅट ऑफिस पार्क्स आहेत जे मुंबई, कोलकाता (कलकत्ता), गुरुग्राम (गुडगाव ) आणि नोईडा या शहरात आहेत . कंपनीच्या प्राथमिक पोर्टफोलिओ (initial portfolio ) मध्ये केनसिंग्टन मुंबई, कँडर टेक्नॉस्पेस नोयडा, कँडर टेक्नॉस्पेस गुडगाव, कँडर टेक्नॉस्पेस कोलकाता या कर्मशियल ऑफिस प्रॉपर्टीज चा समावेश आहे. 

ब्रुकफिल्ड

ट्रस्टचा पोर्टफोलिओ १४ msf (मिलियन स्क्वेअर फिट) चा असून या पैकी ९.८ msf (मिलियन स्क्वेअर फिट) एरिया बांधून पूर्ण झालेला असून ०.६ msf (मिलियन स्क्वेअर फिट) एरियाचे बांधकाम सुरू आहे. कंपनीच्या प्राथमिक पोर्टफोलिओ मधील ९६% जागा ही वापरत असून ही मोठ्या उद्योगास लीज वर देण्यात आली आहे. बार्कलेज, बँक ऑफ अमेरिका कॉंटीनम, RBS, ॲक्सेंचर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ब्रुकफिल्ड REIT चे ग्राहक आहेत.

ब्रूकफिल्ड REIT च्या पोर्टफोलिओ मध्ये फेस्टस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, कँडर कोलकाता वन हाय-टेक स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, शांतीनिकेतन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि  कँडर इंडिया ऑफिस पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होतो. ब्रूकफिल्ड REIT कडे या कंपन्यांचे (ॲसेट SVP) १००% इक्विटी आणि CCD (कंपलसरी कन्वर्टीबल डिबेंचर्स ) आहेत.

ब्रुकफिल्ड REIT ची वैशिष्टे

ग्लोबल स्पॉन्सर्स

जगातील मोठ्या रिअल इस्टेट ओनर्स द्वारे स्पॉन्सर्ड आणि मॅनेज केला जाणारा REIT

मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीज

डायव्हर्सीफाईड  टेनंट पोर्टफोलिओ (विविध व्यवसायात गुंतलेले भाडेकरू ) 

उत्तम ग्रोथ ऑपॉर्च्यूनिटीज.

अनुभवी मॅनेजमेंट

ही  ब्रूकफिल्ड REIT व्यावसायिक बलस्थाने आहेत.

फायनान्शियल डेटा

 ३० सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स५१३६७.१५५३७८०.५०५०४३६.९७४८९३२.९७
इन्कम४६७४.६६९८१३.९५९२९८.३०८६६२.५१
प्रॉफिट(७३९.२२)१५१.२२(१५७.४५)१६१०.८४

(आकडे दशलक्ष रुपयात)

IPO ऑफर आणि डिटेल्स

वर उल्लेख केल्या प्रमाणे  हा आयपीओ ३ फेब्रुवारी २०२१ रोजी खुला होत असून ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत खुला असणार आहे.  हा आयपीओ इश्यू  ३८००० दशलक्ष रूपयांचा असून बुक बिल्ट इश्यू असणार आहे.

 ब्रूकफिल्ड REIT कडे  असणाऱ्या ॲसेट SVP’s वर असणारे कर्ज कमी करणे आणि इतर कॉर्पोरेट उद्दिष्ट पूर्ण करणे हे  या आयपीओ मागील  प्रमुख उद्देश आहेत. BSREP इंडिया ऑफिस होल्डिंग (BSREP India Office Holdings V Pte. Ltd.) ही  कंपनी ब्रूकफिल्ड REITची प्रमोटर आहे.

आयपीओ तपशील

आयपीओ खुला होण्याची तारीख३ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख५ फेब्रुवारी २०२१
आयपीओ प्रकारबुक बिल्ट इश्यू
साईज३८०० कोटी
फेस व्हॅल्यू          १०
प्राइज बॅंड           ₹२७४- ₹२७५
लॉट२००
लिस्टिंग एक्स्चेंज  BSE, NSE

अंदाजे वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख      ३ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख        ५ फेब्रुवारी २०२१
अलॉटमेंट तारीख ११ /१२ फेब्रुवारी २०२१
रिफंड१२ फेब्रुवारी २०२१
डिमॅट ट्रान्सफर तारीख       १२ फेब्रुवारी २०२१
लिस्टिंग तारीख    १७ फेब्रुवारी २०२१

ग्लोबल को-ऑर्डिनेटर अँड  बूक रनिंग लीड मॅनेजर्स

 मॉरगन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड
सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

बूक रनिंग लीड मॅनेजर्स

अँबीट प्रायव्हेट लिमिटेड
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड
IIFL सिक्युरिटीज लिमिटेड
SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड
JM फायनान्शियल लिमिटेड
जे.पी.मॉरगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड

रजिस्ट्रार

लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

संपर्क

कँडर टेकस्पेस  IT/ITES सेझ, बिल्डिंग ५अ/१०,

 सेक्टर ४८, टिकरी (सुभाष चौका जवळ),

 गुरुग्राम, हरियाणा 

ईमेल -: reit.compliance@brookfield.com

 वेब साईट -:www.brookfieldindiareit.in

list of Upcoming IPO

Other sites

One thought on “५. ब्रुकफिल्ड REIT आयपीओ : (5. Brookfield REIT IPO)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *