bank-img

बँक अकाऊंट : सेव्हिंग की करंट?

DIFFERENCE BETWEEN A SAVINGS ACCOUNT AND A CURRENT ACCOUNT

आजचे युग ही एक डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. अमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून आपण घरबसल्या वस्तु खरेदी करतो. त्यासाठी पेमेंट  हे फोन, कंप्यूटर वापरुन upi, डेबिट कार्ड, द्वारे  करतो. टॅक्स, बिल पेमेंट, अशा अनेक गोष्टी आज फोन वरूनच होतात.  पण या साठी बँक अकाऊंट असणे गरजेचे असते. जर बँक अकाऊंटच नसेल  तर, आपणास वरील सुविधा वापरता येत नाहीत. सरकार कडून मिळणारे अनुदान म्हणा नाहीतर शिष्यवृत्ती बँकेत अकाऊंट असेल तरच मिळते. त्यामुळे बँक अकाऊंट असणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. पण  बँकेत गेले असता किंवा अगदी बँकेच्या वेबसाईट वर पहिले असता आपण सेव्हिंग अकाऊंट आणि करंट अकाऊंट असे दोन पर्याय दिसतात.तर या सेव्हिंग अकाऊंट आणि करंट  अकाऊंट मध्ये काय फरक असतो? कोणते अकाऊंट कोणासाठी उपयुक्त आहे? कोण उघडू शकतो ते आपण आज पाहू .

अर्थ

सेव्हिंग अकाऊंट हे वैयक्तिक  अकाऊंट असून नावाप्रमाणे याचा उपयोग बचतीसाठी होतो.  सेव्हिंग अकाऊंट हे  डिपॉजिट अकाऊंट म्हणून ओळखले जाते, तर  करंट  अकाऊंट हे व्यवसायासाठी वापरले जाते.  व्यावसायिक उलाढालीसाठी याचा वापर करण्यात येतो. 

उपयुक्तता

सर्वसाधारणपणे सेव्हिंग अकाऊंट हे कोणत्याही व्यक्तिस उघडता येते. तर करंट अकाऊंट हे बहुधा कंपन्या, व्यवसायिक संस्था, आर्थिक व्यवहार करण्यासाठी करतात. पगारदार व्यक्ति अथवा ज्याना मासिक उत्पन्न मिळते त्यांच्या साठी सेव्हिंग अकाऊंट योग्य ठरते. तर करंट अकाऊंट हे व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक ज्याना व्यवहारासाठी सातत्याने अकाऊंटचा वापर करावा लागतो त्यांच्यासाठी उपयु्क्त असते.

व्याज

करंट अकाऊंट मधील पैसा व्यावसायिक, उलाढालीसाठी सतत वापरात असतो. म्हणून करंट अकाऊंटमध्ये असणाऱ्या रकमेवर व्याज दिले जात नाही. करंट अकाऊंट हे व्याज-विरहीत डिपॉजिट अकाऊंट म्हणून ओळखले जाते. सेव्हिंग अकाऊंटवर व्याज दिले जाते.

मिनिमम बॅलन्स

बँक अकाऊंट उघडले की त्यामध्ये मिनीमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो. सेव्हिंग अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स हा बहुधा कमी असतो. तर करंट अकाऊंटमध्ये तुलना करता मिनिमम बॅलन्स हा जास्त ठेवावा लागतो. हा मिनिमम बॅलन्स जर कमी झाला तर वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम सेव्हिंग अकाऊंटमध्ये करंट अकाऊंटच्या तुलनेने कमी असते. तसेच, सेव्हींग अकाऊंटमध्ये पैसा ठेवण्यावर मर्यादा असते ही मर्यादा करंट अकाऊंटला लागू होत नाही.

व्यवहार मर्यादा

प्रति महिना करण्यात येणाऱ्या व्यवहारावर सेव्हींग अकाउंट मध्ये मर्यादा असतात. बहुतेक बँकामध्ये एका महिन्यात ३-४ व्यवहार करता येतात. अशा मर्यादा करंट अकाउंटला लागू होत नाहीत.

सुविधा

व्यवसायासाठी गरजेच्या असणाऱ्या सुविधा करंट अकाऊंट सोबत देण्यात येतात उदा. सेव्हिंग अकाऊंट धारकास ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात येत नाही. करंट अकाऊंट धारकास ही सुविधा देण्यात येते. तसेच फ्री चेक बूक, बिझनेस क्रेडीट कार्ड,  अशा सुविधा करंट अकाऊंट सोबत देण्यात येतात

कर आकारणी

सेव्हिंग अकाऊंट मध्ये असलेल्या रकमेवर व्याज दिले जात असल्याने त्यावर कर आकारणी होते. याउलट, करंट अकाऊंट मधील रकमेवर ते देण्यात येत नसल्याने या अकाऊंट मध्ये असणाऱ्या रकमेवर कर आकारणी होत  नाही.

 सेव्हिंग अकाऊंटकरंट अकाऊंट
व्याजव्याज देण्यात येतेव्याज देण्यात येत नाही
व्यवहारांची मर्यादामर्यादित व्यवहारअमर्याद व्यवहार
हेतूबचती साठीव्यावसाईक उपयोगासाठी
मिनिमम बॅलन्सकमी जास्त
वापर कर्ता कोणतीही व्यक्तिउद्योजक, व्यावसायिक
सेव्हिंग अकाऊंट आणि करंट अकाऊंट मधील फरक

One thought on “बँक अकाऊंट : सेव्हिंग की करंट?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *