न्युरेका लिमिटेड

६. न्युरेका लिमिटेड आयपीओ

न्युरेका लिमिटेड

इंडिगो पेंट्स, स्टोव्हक्राफ्ट यांच्या आयपीओ नंतर न्युरेका लिमिटेड ही कंपनी आपला आयपीओ आणत आहे. न्युरेकाचा आयपीओ येत्या १५ फेब्रुवारी २०२१ रोजी खुला होत असून १७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत खुला असणार आहे. कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स सेबीकडे नोव्हेंबर २०२० मध्ये सादर केले होते.

कंपनीची माहिती आणि इतिहास.

न्युरेका लिमिटेडची स्थापना २ नोव्हेंबर २०१६ रोजी न्युरेका प्रायव्हेट लिमिटेड या नावाने दिल्ली येथे झाली होती. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्ली येथून मुंबई येथे हलविण्यात आले. १९ जुन २०२० रोजी झालेल्या मीटींग मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कंपनीचे रुपांतरण पब्लिक लिमिटेड कंपनी मध्ये करण्यात आले. साैरभ गोयल हे कंपनीचे प्रमोटर आहेत.

कंपनीचा व्यवसाय.

न्युरेका लिमिटेड हि कंपनी घरगुती वापरामध्ये येणारे हेल्थकेअर आणि वेलनेस प्रॉड्क्ट्सची निर्मिती करते. कंपनी गंभीर आजार असणार्‍या रुग्णासाठी त्यांचे दैनंदिन आयुष्य जगणे सोपे व्हावे याकरिता विविध प्रॉडक्ड्स आणि उपकरणांची निर्मिती करते. कंपनी सध्या पाच प्रकारची प्रॉडक्ड्स आणि उपकरणे बनवत असून ज्यामध्ये क्रोनिक डिव्हाइस प्रॉड्क्ट्स, ऑर्थॊपेडीक प्रॉड्क्ट्स, मदर अँड चाईल्ड प्रॉड्क्ट्स, न्यूट्रीशन सप्लिमेंट्स, लाईफस्टाईल प्रॉड्क्ट्स यांचा समावेश होतो.

क्रोनिक डिव्हाइस प्रॉड्क्ट्स

या प्रॉड्क्ट कॅटॅगरी मध्ये कंपनी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग डिव्हाइसेस, पल्स ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, नेब्युलायजर्स, सेल्फ मॉनिटरिंग ग्लुकोज डिव्हाइसेस ह्युमिडिफायर्स आणि स्टीमर्स यांची निर्मीती करते.

ऑर्थॊपेडीक प्रॉड्क्ट्स

या प्रॉड्क्ट कॅटॅगरी मध्ये कंपनी व्हीलचेअर, वॉकर, मसाजर्स, लंबर अँड टेल बोन सपोर्ट्स यांची निर्मीती करते.

मदर अँड चाईल्ड प्रॉड्क्ट्स,

या प्रॉड्क्ट कॅटॅगरी मध्ये कंपनी ब्रेस्ट पंप्स, बॉटल सॅनिटायझर्स, बॉटल वॉर्मर, बेबी कार सीट्स आणि बेबी कॉट यांची निर्मीती करते.

न्यूट्रीशन सप्लिमेंट्स

या कॅटॅगरी मध्ये कंपनी फिश ऑईल, मल्टीव्हिटामिन्स, प्रोबायोटिक्स, ॲपल सायडर, व्हिनेगर या सारख्या प्रॉड्क्ट्स ची निर्मिती करते. या सोबतच कंपनी स्मार्ट स्केल्स (वजन करण्याचे उपकरण), फिटनेस ट्रॅकर, अरोमा डिफ्युजर्स यांचे उत्पादन करते.

कंपनीचे डॉ. ट्रस्ट (Dr.Trust), डॉ. फिजीओ (Dr. Physio), आणि ट्रु मॉम Trumom, हे तीन प्रमुख ब्रँड आहेत. कंपनी आपल्या उत्पादनांची वि्क्री इ-कॉमर्स वेबसाईट आणि स्वत:ची drtrust.in या वेबसाईट द्वारे करते.

स्ट्राँग पोर्टफोलिओ,क्वालिटी,आणि नाविन्यपुर्ण उत्पादने

उत्तम डिस्ट्रीब्युशन नेटवर्क,

अनुभवी व्यवस्थापन

ही या न्यूरेका लिमिटेडची बलस्थाने आहेत

न्यूरेका लिमिटेड फायनान्शिअल्स.


३० सप्टेंबर २०२०३१ मार्च २०२०३१ मार्च २०१९३१ मार्च २०१८
ॲसेट्स१०२४.८८३३८.८३२३५.१८७०.१९
रेव्हेन्यू१२२९.७३९९४.८७६१९.८३२००.६९
प्रॉफिट (PAT)३६१.८०६३.९५६२.२६३१.१२

(सर्व आकडे दशलक्ष रुपयात)

IPO ऑफर

न्युरेका लिमिटेडचा आयपीओ वर उल्लेख केल्या प्रमाणे १५ फेब्रुवारी रोजी खुला होत आहे. कंपनीचा हा बुक बिल्डींग इश्यू असून हा इश्यू १०० कोटीचा असणार आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत हा आयपीओ खुला असणार आहे.

आयपीओ (IPO) उद्देश

कंपनी साठी वर्किंग कॅपिटल उभे करणे.

कंपनीचे इतर कॉर्पोरेट उद्दिष्टे पुर्ण करणे.

आयपीओ (IPO) तपशील

आयपीओ खुला होण्याची तारीख१५ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१७ फेब्रुवारी २०२१
साईज१०० कोटी
लॉट साईज३५
प्राईज बँड₹३९६ – ₹४००
फेस व्हॅल्यू₹ १०
एक्सचेंजNSE – BSE

आयपीओ (IPO) वेळापत्रक

आयपीओ खुला होण्याची तारीख१५ फेब्रुवारी २०२१
आयपीओ बंद होण्याची तारीख१७ फेब्रुवारी २०२१
अलॉटमेंट२३/२४ फेब्रुवारी २०२१
रिफंड२४ फेब्रुवारी २०२१
लिस्टींग२६ फेब्रुवारी २०२१

बुक रनिंग लीड मॅनेजर्स

ITI कॅपिटल लिमिटेड.

रजिस्ट्रार

लिंक इन-टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनीचा संपर्क

१२८ गाळा नंबर, उद्योग भवन पहिला मजला,

सोनावाला लेन, गोरेगाव (पू), मुंबई,

महाराष्ट्र, ४०००६३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *