इंटेलकडून जिओ मध्ये ०.३९% हिस्सेदारी खरेदी.

इंटेल कॉर्पोरेशन, प्रोसेसर निर्मितीतील अग्रगण्य कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या उपकंपनीतील ०.३९% हिस्सा खरेदी केला.

इंटेलने इंटेल कॅपिटल या आपल्या उपकंपनी मार्फत जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड मध्ये १८९४.५० कोटी गुंतवणूक करून हिस्सेदारी खरेदी केली.

जिओचे सध्या ३८८ दशलक्ष ग्राहक असून, जिओ सध्या इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT), क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ऑगमेंटेड रिअलिटी, ब्लॉकचेन या तंत्रज्ञानात इन्व्हेस्ट करत आहे.  

इंटेल  कॅपिटल जगभरातील टेक कंपन्यांत गुंतवणूक करते. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT), क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 5G या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यामध्ये  इंटेल कॅपिटल गुंतवणूक करते. १९९१ पासून इंटेल  कॅपिटल जगभरातील वेगवेगळ्या  कंपन्यामध्ये १२९० कोटी डॉलर्स गुंतवणूक केली आहे.

यावर्षी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये विविध कंपन्याकडून १७७,५८८.४५ कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. या मध्ये फेसबूक, अदिया, सिल्वरलेक पार्टनर्स, अशा कंपन्यांचा समावेश आहे.  

One thought on “इंटेलकडून जिओ मध्ये ०.३९% हिस्सेदारी खरेदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *