आयकर विभागाकडून नवीन ITR फॉर्म्स सादर

आयकर विभागाने यावर्षी आयकर भरण्यासाठी नवीन फॉर्म्स उपलब्ध करून दिले आहेत. आयकर विभागाच्या वेबसाइटवर गेले असता आपणास आयटीआर-१ ते आयटीआर-७ असे ७ विविध प्रकारचे फॉर्म्स पाहायला मिळतात. नेमका कोणता फॉर्म भरून आयकर परतावा सादर करायचा हे बहुतेकाना गोंधळात टाकते.

आपण आज हे फॉर्म्स बाबतची माहिती आणि आपण नेमका कोणता फॉर्म भरावा ते आपण पाहू

आयटीआर-१(ITR-1 )                           

हा फॉर्म त्या व्यक्तिंसाठी आहे ज्यांचे उत्पन्न पगार, एकल गृह मालमत्ता, व्याज, व इतर स्रोतांपासून येते, या सोबत ज्यांचे शेतीतून येणारे उत्पन्न ५००० रुपयांपर्यंत आहे. आणि एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांनी हा फॉर्म भरून आपला आयकर परतावा सादर करावा. जे व्यक्ति एखाद्या कंपनीवर डायरेक्टर( निर्देशक) म्हणून काम करतात, तसेच ज्या लोकानी गैर सूचीबद्ध समभागामध्ये (Non-Listed Stocks) गुंतवणूक केली आहे, ते हा फॉर्म भरू शकत नाहीत. हा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन सादर करता येतो.   

आयटीआर-२(ITR-2)

हा फॉर्म व्यक्ति आणि HUF (हिंदू संयुक्त परिवार) यांच्या साठी असून ज्यांचे उत्पन्न व्यापार अथवा व्यवसायातील झालेल्या फायद्यापासून येत नाही. ऑफलाइन सादर करता येतो.

आयटीआर-३(ITR-3 )

हा फॉर्म व्यक्तिसाठी आणि HUF (हिंदू संयुक्त परिवार) यांच्या साठी असून ज्यांचे उत्पन्न व्यापार अथवा व्यवसायातील झालेल्या फायद्यापासून मिळते. ऑफलाइन सादर करता येतो.

आयटीआर-४(ITR4)

हा फॉर्म त्या व्यक्ति, HUF (हिंदू संयुक्त परिवार), फर्मस् (LLP सोडून) यांच्या साठी आहे.  जे भारतीय नागरिक  आहेत आणि ज्यांचे व्यापार अथवा व्यवसायापासून उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत असून जे सेक्शन 44AD, 44DA, आणि 44 AE  द्वारा अनुमानित केले जाते. हा फॉर्म त्यांच्या साठी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन सादर करता येतो.

आयटीआर-५(ITR5)

हा फॉर्म व्यक्ति, HUF (हिंदू संयुक्त परिवार), कंपनी, आणि जे  (ITR-7) फॉर्म भरतात त्या व्यतिरिक्त व्यक्तिंसाठी आहे. हा फॉर्म LLP, AOP (असोशिएशन ऑफ पर्सन), आणि BOI (बॉडी ऑफ इंडिविजुयल)AJP  आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, मृत व्यक्तीची मालमत्ता, दिवाळखोरीतील मालमत्ता, बिजनेस ट्रस्ट,इन्व्हेस्टमेंट फंडस् ,को-ओपरेटीव्ह सोसायटी आणि लोकल ऑथरिटी यांच्यासाठी आहे.ऑफलाइन सादर करता येतो

आयटीआर-६(ITR-6)

हा फॉर्म सेक्शन ११ खाली करमाफीचा दावा करणाऱ्या कंपनी व्यतिरिक्त  इतर कंपनी साठी आहे. ऑफलाइन सादर करता येतो

आयटीआर-७(ITR-7)

हा फॉर्म कंपनी, तसेच त्या व्यक्ती साठी आहे ज्याना (139)4 A, (139)4B, (139)4 C, (139)4D, खाली आयकर परतावा सादर करणे बंधन कारक आहे. ऑफलाइन सादर करता येतो.

  • ऑनलाइन पद्धतीमध्ये  आयकर विभागाच्या वेबसाइटवर लॉगिन केल्यावर करदाता ITR /फॉर्म  निवडून, भरून  सादर करू शकतात.
  • ऑफलाइन पद्धतीमध्ये  करदात्यास आयकर विभागाच्या वेबसाइटवरून जावा अथवा एक्सेल युटीलिटि डाउनलोड करून  यात माहिती भरून XML फाइल जनरेट करावी लागते. आयकर विभागाच्या साईटवर लॉगिन करून XML फाइल अपलोड करून आयकर परतावा  सादर करू शकतात.

वर उद्धृत सर्व फॉर्म्स आपणास या लिंकवर पाहायला मिळतील : https://www.incometaxindia.gov.in/_layouts/15/dit/mobile/forms/income-tax-returns.aspx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *