अदिया (ADIA ) जिओ मध्ये रू. ५६८३.५० कोटी गुंतवणूक करणार.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने घोषित केले आहे की adia (अबू-धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मस मध्ये ५६८३.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शेयर बाजाराला पाठवविलेल्या पत्रामध्ये ही माहिती कळवली आहे.  ५६८३.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून adia  जिओ मध्ये १.१६ % भाग खरेदी करेल. या गुंतवणूकी सोबतच जिओने आजपर्यंत ९७८८५.६५ कोटी रूपये उभे केले आहेत.

या आधी फेसबूक, सिल्व्हरलेक इक्विटी, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, KKR  मुबादला, आणि ADIA यांनी जिओ मध्ये गुंतवणूक केली आहे.

१९७६ साली स्थापन झालेली ADIA ही जागतिक स्तरावर गुंतवणूक करणारी वित्तीय संस्था आहे. ही संस्था अबू-धाबी सरकारच्या वतीने गुंतवणूक करते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *